महागाव शिवारात तरुणाचा दगडाने ठेचून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:19+5:302021-07-10T04:16:19+5:30
पोलीस नाईक मनोज जाधव यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, शुक्रवारी ९ जुलै ...
पोलीस नाईक मनोज जाधव यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, शुक्रवारी ९ जुलै रोजी सकाळी ६.३०च्या सुमारास महागावचे तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी फोनवरुन महागाव शिवारात फॉरेस्टमध्ये एक अनोळखी व्यक्तीचा चेहरा विद्रुपावस्थेत पडल्याचे सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांना याबाबत माहिती दिली. तातडीने सपोनि तोरण तोरडमल, पोलीस हवालदार मनोज भोसले, शैलेश चौगुले, मनोज जाधव, पांडुरंग मुंडे, सतीश कोठावळे, सुनील बोधनवाड, विनायक घुगे ही टीम महागाव येथे घटनास्थळी दाखल झाली. तेथे ४० ते ४५ वयाचा व्यक्ती विद्रुपावस्थेत दिसला. त्याचा पांढऱ्या रंगाचा शर्ट रक्ताने माखलेला होता व काळपट रंगाची पॅन्ट घातलेली होती. मैलाचा दगड डोक्यात घालून चेहरा विद्रूप केल्याचे आढळून आले. त्याच्या गळ्याभोवती व अंगावर खरचटलेल्या खुणा दिसून आल्या. मयताचा मयताचा पंचनामा करून शवविच्छदनासाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले
याबाबत पांगरी पोलिस स्टेशनला भा.दं.वि. ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करीत आहेत.
-----
घटनास्थळी चारचाकी वाहनांच्या खुणा
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करून तपासाबाबत काही सूचना दिल्या. घटनास्थळावर मयताची ओळख पटू शकेल, असे कोणतेही प्रकारची पुरावे नाहीत. मयताची ओळख पटू नये, म्हणून तोंड ठेचून विद्रूप केले आहे. गुरुवारी रिमझिम पाऊस झाल्यामुळे चारचाकी वाहनाचे टायरचे मार्किंग दिसून आले. या तपास कामी दोन पथके पोलीस हवालदार मनोज भोसले, कुणाल पाटील, मनोज जाधव, विनायक घुगे यांचे पथक तुळजापूर भागात रवाना झाले. दुसरे पथक उस्मानाबाद, येडशीकडे पोलीस हवालदार शैलेश चौगुले, पांडुरंग मुंडे, संदीप कवडे, सुनील बोधमवाढ व पोलीस कोळी हे तपासासाठी गेले आहेत.