कुंभारी येथील जुगार अड्ड्यावर धाड; ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:28 AM2019-01-07T10:28:26+5:302019-01-07T10:29:22+5:30
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात ४ लाख २ हजार ...
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात ४ लाख २ हजार ६५0 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी ४.४५ वाजता करण्यात आली.
प्रकाश चंद्रशेखर कोटे (रा. मल्लिकार्जुन नगर सोलापूर ), सिद्धाण्णा बसण्णा खंटे (रा. कुंभारी, ता.दक्षिण सोलापूर), राजेंद्र राम मनगुळे (रा.मल्लिकार्जुन नगर, सोलापूर), रमेश अमृत लिंबीतोडे (रा.मल्लिकार्जुन नगर, सोलापूर), विजय वसंत धनशेट्टी (रा.मल्लिकार्जुन नगर, सोलापूर), महादेव बसण्णा बिराजदार (रा.मल्लिकार्जुन नगर, सोलापूर), शिवशरण विठ्ठल हेबळे (रा.राजीव नगर, सोलापूर), कांतप्पा बसण्णा बिराजदार (रा.मल्लिकार्जुन नगर, सोलापूर) आदी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार आली होती. याची दखल घेत पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
कुंभारी गावच्या हद्दीतील भैरव टेक्स्टाईलजवळ जमादार वीटभट्टीच्या बाजूस उघड्यावर असलेल्या जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकण्यात आली. तेथे आरोपींच्या ताब्यातील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, वाहने असा एकूण ४ लाख २ हजार ६५0 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष टीममधील पोलीस सब इन्स्पेक्टर ए. एस. तांबे, डी. एस. दळवी,पोलीस कॉस्टेबल अक्षय कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल रविराज गटकूळ, नवनाथ थिटे,उत्तरेश्वर घुले, योगेश येवले, चालक पोलीस कॉन्स्टेबल आनंद दिगे या टीमने पार पाडली.
अधीक्षकांचे आवाहन
- जिल्ह्यात जर कोणत्या ठिकाणी अशा प्रकारचे जुगार अड्डे व अवैध धंदे सुरू असतील तर नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी, संबंधितांवर कारवाई केली जाईल असे अवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.