सदस्यांच्या गोंधळामुळे जिल्हा परिषदेची व्हिडिओ कॉलिंग सभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 03:11 PM2020-06-09T15:11:12+5:302020-06-09T15:12:18+5:30

प्रशासनावर नामुष्की; जिल्हाधिकाºयांच्या परवानगीने खुल्या सभागृहात सभा घेण्याची मागणी

Zilla Parishad video calling meeting scheduled due to confusion of members | सदस्यांच्या गोंधळामुळे जिल्हा परिषदेची व्हिडिओ कॉलिंग सभा तहकूब

सदस्यांच्या गोंधळामुळे जिल्हा परिषदेची व्हिडिओ कॉलिंग सभा तहकूब

Next
ठळक मुद्दे- सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा- सदस्यांच्या गोंधळामुळे प्रशासनाने केली सभा तहकूब- जिल्ह्याच्या दृष्टीने असलेले महत्वाचे विषय राहिले बाजूला

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्वाच्या विषयासाठी घेतलेले व्हिडिओ कॉलिंगची सभा सदस्यांच्या गोंधळामुळे तहकूब करण्याची नामुष्की प्रशासनावर आली.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुख्य कार्यकारी प्रकाश वायचळ यांच्या कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली़. या सभेला मोबाईल कॉलदारे ५८ सदस्य कनेक्ट होते सभा सुरू झाल्यावर आरोग्य विभागाच्या साहित्य खरेदी वरून गोंधळ झाला. सर्व सदस्य एकाच वेळी बोलू लागल्यामुळे सभेचे कामकाज व्यवस्थितपणे होऊ शकले नाही, त्यामुळे पंचवीस मिनिटातच सभा तहकूब करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिली. त्यामुळे सभा तहकूब करण्यात आली.

या सभेत उपस्थित असलेले अध्यक्ष कांबळे व उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी सदस्यांना दिलेले उत्तर व्यवस्थित ऐकू येत नव्हते, सदस्य एकाचवेळी बोलत असल्यामुळे कामकाजात गोंधळ दिसत होता, त्यामुळे सदस्यांनी जिल्हाधिकाºयांच्या परवानगीने खुल्या सभागृहात ही सभा घ्यावी अशी मागणी केली, त्यानंतर सभा तहकूब करण्याचा निर्णय झाला.


 

Web Title: Zilla Parishad video calling meeting scheduled due to confusion of members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.