जिल्हा परिषदेची शेळगाव शाळा अप्रतिमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:29 AM2021-09-10T04:29:02+5:302021-09-10T04:29:02+5:30
स्वच्छ शाळा..सुंदर शाळा अभियानअंतर्गत अचानक शाळा पाहणीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषदेच्या शेळगाव ...
स्वच्छ शाळा..सुंदर शाळा अभियानअंतर्गत अचानक शाळा पाहणीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषदेच्या शेळगाव (आर) प्राथमिक शाळेस भेट दिली. शाळेतील आठही वर्गांची सखोल पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळा अप्रतिम ठेवल्याबद्दल गौरवोद्गार काढले.
या पाहणीत शाळेतील स्वच्छता, वर्गातील नियोजनबद्ध अभ्यासक्रमाचे डिजिटल तक्ते, सर्व वर्गांतील एलईडीवरील शिक्षकांनी बनविलेले विविध व्हिडीओ, कोरोनाकाळातील शिक्षकांचे उपक्रम, वर्तमानपत्रातील शिक्षकांचे समयसूचक लेखन, शिक्षकांनी आर्थिक योगदानाची सुरुवात स्वतःपासून करून ग्रामस्थांचा मिळविलेला लाखो रुपयांचा लोकसहभाग, शालेय शिस्त पाहून स्वामी यांनी कौतुक केले.
दोन तासांच्या आपल्या सुसंवादात सीईओ स्वामी यांनी शिक्षकांशी संवाद साधला.
यावेळी शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, गटशिक्षणाधिकारी साधना काकडे, विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत जाधव, हरिष राऊत, स्वाती स्वामी, केंद्रप्रमुख बाबासाहेब ढगे, मुख्याध्यापक हनुमंत सोनवणे, सहशिक्षक रंगनाथ काकडे, रुपाली बिडवे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी शाळेतील सहशिक्षक दीपक शेळके, दत्तात्रय सावंत, अमिता क्षीरसागर, वैशाली नावगुडे, स्वाती चव्हाण, पल्लवी भालशंकर, रंगनाथ काकडे उपस्थित होते.
---
फोटो ०९वैराग-शेळगाव स्कूल
शेळगावच्या शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, गटशिक्षणाधिकारी साधना काकडे, विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत जाधव, हरिष राऊत, स्वाती स्वामी, केंद्रप्रमुख बाबासाहेब ढगे आदी.