प्राणीसंग्रहालयातील माकडांना रामलिंग अभयारण्यात सोडले
By admin | Published: July 6, 2016 12:47 PM2016-07-06T12:47:36+5:302016-07-06T12:47:36+5:30
महापालिकेच्या महात्मा गांधी राष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील २५ माकडांना उस्मानाबाद जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्यात नुकतेच मुक्तपणे सोडण्यात आले आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ६ - महापालिकेच्या महात्मा गांधी राष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील २५ माकडांना उस्मानाबाद जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्यात नुकतेच मुक्तपणे सोडण्यात आले आहे.
सोलापुरात महात्मा गांधी प्राणी संग्रहालय हे बालगोपाळ व पर्यटकांचे आकर्षण असलेले केंद्र आहे. या केंद्रात असलेल्या सिंह ‘शंकर’ याचे दोन महिन्यापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर प्राणीसंग्रहालयात असलेल्या माकडांच्या अवखळ लिला बालगोपाळांना पाहत येत होत्या. यातील बहुंताश माकडे ही अभयारण्यातून शहरात फिरत आलेली होती. या माकडांना पकडून या प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आले होते.
यातून त्यांची संख्या २५ पर्यंत गेली होती. संख्या वाढल्याने पिंजरा अपुरा पडत होता. त्यामुळे गतवर्षी या माकडांना खरूजची लागण झाली होती. अंगावरील केस गेल्याने माकडांची अवस्था बिकट झाली होती. पशुवैद्यकीय अधिकारी पंकज रापतवार यांनी उपचार करून माकडांना या आजारातून बरे केले होते.
२०१० पासून महापालिकेने वन विभागाकडे या माकडांविषयी पत्रव्यवहार सुरू केला होता. या माकडांना अभयारण्यात मुक्त करण्यात यावे यासाठी वारंवार पाठपुरवा करण्यात आला. याला वनविभागाने हिरवा कंदील दाखविला. वन विभागाची परवानगी मिळाल्यावर महापालिका आयुक्त विजयकुमार काळम यांनी या माकडांना रामलिंग अभयारण्यात सोडण्याची परवानगी दिली.
अभयारण्यात त्यांना रोगांचा पार्दुभाव होऊ नये यासाठी लसीकरण करण्यात आले. त्यानंतर अभयारण्यातील वातावरणाचा अभ्यास करून त्यांना तेथे नेऊन सोडण्यात आले. त्यांच्या हालचालीवर वन विभागाचे पथक लक्ष ठेवून आहे.