झेडपी अध्यक्ष झालो, म्हणून झाडलोट करायला लाज कसली?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 05:44 AM2020-01-06T05:44:29+5:302020-01-06T05:44:37+5:30

मी माझा प्रपंच करत आलोय़ मी झेडपीचा अध्यक्ष झालो असलो तरी माझ्या प्रपंचासाठी गायी-म्हशीच्या धारा काढून झाडलोट करावीच लागणार आहे़

ZP became president, so ashamed to bribe? | झेडपी अध्यक्ष झालो, म्हणून झाडलोट करायला लाज कसली?

झेडपी अध्यक्ष झालो, म्हणून झाडलोट करायला लाज कसली?

googlenewsNext

नासीर कबीर 
करमाळा : दुधाच्या रतिबातून जे पैसे मिळतात त्यातूनच मी माझा प्रपंच करत आलोय़ मी झेडपीचा अध्यक्ष झालो असलो तरी माझ्या प्रपंचासाठी गायी-म्हशीच्या धारा काढून झाडलोट करावीच लागणार आहे़ यात लाज वाटायचं कारणच नाही, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले.
अनिरुद्ध ऊर्फ आण्णा कांबळे हे गरीब कुटुंबातील असून केम (ता़ करमाळा) गावापासून दीड किलोमीटर अंतरावर वडिलोपार्जित १५ एकर जिरायत जमीन आहे.
ते म्हणाले, घरात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले आहेत़ एक मुलगा अकलूज येथे बारावीत तर दुसरा मुलगा केम येथे दहावीमध्ये शिकत आहे. कांबळेंची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे़ पाऊस पडला तर शेती पिकते अन्यथा दुष्काळास सामोरे जावे लागते़ त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला़ दररोज १० लिटर दूध केम गावात रतिबाने दिले जाते़ जे पैसे मिळतात त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करून गावात राजकारण व समाजकारण करीत असल्याचे त्यांनी सांगितले़
अध्यक्ष झाल्याचा आनंदच़़़
पाऊस पाण्याचं काही खरं नसल्यानं घरप्रपंच व मुलांचं शिक्षण करण्यासाठी दूध धंदा सुरू केला. १४ लहान-मोठ्या देशी, खिलार गाई गुजरातहून आणल्या. गाईगुरांची झाडलोट, धारा काढणे ही सर्व कामे तेच करतात. मी त्यांना मदत करते. गेल्या आठवड्यात मला त्यांनी सांगितलं की, मी झेडपी अध्यक्ष होणाराय़ तेव्हा मी विचारलं, अध्यक्ष म्हणजे काय? त्यांनी मला सांगितलं़ आठवड्यातून चार दिवस बाहेर काम करावं लागतं़ तेव्हा मी त्यांना म्हणाले, गायगुरांचं कसं होईल? ते अध्यक्ष झाल्यानंतर मला आनंदच झाल्याची भावना कांबळे यांच्या पत्नी शुभांगी यांनी व्यक्त केली़
>कुटुंबातील सर्वांना बरोबर घेऊन आपण प्रपंच करतो़ त्याप्रमाणेच झेडपीचा कारभार आपण सर्वांना बरोबर घेऊन करणार आहे़ तसेच सदस्य असताना ज्याप्रमाणे घरची दैनंदिन कामे आपण करत होतो़, ती सर्व कामे यापुढेही करेन.
- अनिरुद्ध कांबळे, अध्यक्ष, जि.प. सोलापूर

Web Title: ZP became president, so ashamed to bribe?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.