लॉकडाऊनमध्ये झेडपी शाळेचा चेहरामोहरा बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:03+5:302021-06-11T04:16:03+5:30
उपजिल्हाधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांसह २० ते २५ विद्यार्थी चांगल्या पदावर, १०० जण विविध क्षेत्रात तर काही शेती व शेतमजुरी ...
उपजिल्हाधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांसह २० ते २५ विद्यार्थी चांगल्या पदावर, १०० जण विविध क्षेत्रात तर काही शेती व शेतमजुरी करणाऱ्यांचा ८ मे रोजी ‘गावाची साथ, शाळेचा विकास’ हा व्हाॅट्सॲप ग्रुप तयार झाला. चॅटिंग अन् ख्याली-खुशालीबरोबर गुरुजींनी पिण्यासाठी शुद्ध पाणी, संरक्षक भिंत, मुलांसाठी शौचालय, क्रीडा साहित्य, कार्यक्रमासाठी मोठा हाॅल असा विकास आराखडा मांडला. त्यामुळे ग्रुपमधील सदस्यांनी स्वतःचा, मुलांचा, लग्नाचा वाढदिवस अथवा कुठल्याही शुभदिनाचे औचित्य साधत आपल्या इच्छेनुसार ऑनलाइनद्वारे गुरुजींच्या खात्यावर निधी जमा होऊ लागला. एका महिन्यात गुरुजींच्या बँक खात्यावर १ लाख २६ हजार ७०१ रुपये जमा झाले.
माजी गुरुजींना शाळेचा लळा
१९६४ ते ८४ या कालावधीत या शाळेवर नोकरी केलेले सांगोला तालुक्यातील श्रीपती बंडगर या गुरुजींना ३६ वर्षांनंतर शाळेला भेटण्याचा मोह आवरला नाही. स्वतःची तीन मुले या शाळेत घडली. त्यामुळे या शाळेची जोडलेली नाळ आजही कायम आहे. अशा गावोगावच्या शाळांसाठी पुढे येऊन मंदिरांबरोबर विद्यामंदिरांचा जीर्णोद्धार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत स्वतःच्या ५८ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेला देणगी दिली.
कोट :::::::::::::::::
गावच्या शाळा नव्या पिढीच्या जडणघडणीचा पाया आहेत. तिरवंडी शाळेबाबत माजी विद्यार्थी, गावकऱ्यांनी राबविलेल्या उपक्रमामुळे सध्या काम करणाऱ्या आम्हा शिक्षकांचा उत्साह व जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे ही शाळा व विद्यार्थ्यांबाबत नवा आदर्श घडला जाईल.
- राजाराम गुजर,
मुख्याध्यापक