सोलापूरच्या झेडपी अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांसमोर हात जोडले; जाणून घ्या काय होते कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 03:11 PM2021-03-10T15:11:25+5:302021-03-10T15:11:47+5:30

जिल्हा परिषद अध्यक्षांची गांधीगिरी; कोरोना रोखण्यासाठी केली जनजागृती

The ZP president of Solapur joined hands in front of the staff; Find out what happens | सोलापूरच्या झेडपी अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांसमोर हात जोडले; जाणून घ्या काय होते कारण

सोलापूरच्या झेडपी अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांसमोर हात जोडले; जाणून घ्या काय होते कारण

Next

सोलापूर - कोरोनाचा वाढती रूग्णसंख्या पाहता केंद्र व राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध गोष्टींवर निर्बंध घातले आहेत. एवढेच नव्हे तर संसर्ग टाळण्यासाठी जनजागृती, प्रचार व प्रसिध्दीही करण्यात येत आहे. मात्र काही लोक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत असल्याने आता लोकप्रतिनिधींनी लोकांना समजावून सांगण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी बुधवारी चक्क मास्क न घातलेल्या जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांना चक्क हात जोडून मास्क घालण्याविषयी विनंती केली. 

 सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच जिल्हा परिषद गाठली ते जिल्हा परिषद आल्यानंतर कर्मचारी ज्याठिकाणी फेस रिडींग करून हजेरी लावतात त्या ठिकाणी त्यांनी ठाण मांडला. ज्या ज्या कर्मचान्यांनी चेहऱ्यावर मास्क लावले नाहीत त्यांना मास्क लावण्याची विनंती केली, विशेष म्हणजे उशिरा आलेल्या कर्मचा-यांना चहा पाजवला नंतर ते सामान्य प्रशासन अर्थ विभाग, महिला बालकल्याण, समाज कल्याण, माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या आणि जे जे कर्मचारी मस्त लावत नाहीत त्यांना मास्क लावा सोशल डिस्टन्स पाळा, हात सॅनिटायझर अथवा साबणाने स्वच्छ धुवा अशा विविध सूचना केल्या. 

 

Web Title: The ZP president of Solapur joined hands in front of the staff; Find out what happens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.