महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे, रिगन अलबुक्युरेक्यु यांना सुवर्ण तर, मधुरिका पाटकरला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 08:25 AM2018-10-01T08:25:32+5:302018-10-01T08:25:55+5:30
महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंनी पूर्व विभागीय राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
मुंबई : महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंनी पूर्व विभागीय राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. पुरुष एकेरी व मुलांच्या ज्युनियर गटात अनुक्रमे सिद्धेश पांडे व रिगन अलबुक्युरेक्यु यांनी सुवर्णपदक मिळवले. मधुरिका पाटकरने महिला एकेरीत रौप्यपदक मिळवले.
बिनमानांकित सिद्धेशने ज्युनियर माजी जागतिक अव्वल मानांकित मानव ठक्कर याला पराभूत करून जेतेपद पटकावले. तत्पूर्वी, त्याने अमलराज अँथनी, सिवानंदा सेशाद्री, रोनीत भांजा आणि अर्जुन घोष यांना पराभूत केले. मधुरिकाने अंतिम सामन्यात पश्चिम बंगालच्या सुथीर्ता मूखर्जीने मधुरिकाला 4-0 असे नमविले. मुलांच्या ज्युनियर गटातील अंतिम सामन्यात रिगन अलबुक्युरेक्युने गुजरातच्या मनुष शाहला 4-2 असे पराभूत करत सुवर्णपदक मिळवले.
पाटकरची सुरुवात आव्हानात्मक झाली. तिने पश्चिम बंगालच्या प्रेमांगी घोषला 4-2 अशा फरकाने नमविले. पुढच्या सामन्यात ऐश्वर्या देबला 4-0 असे नमविल्यानंतर पुढच्या सामन्यात आरबीआयच्या अमृता पुष्पकने तिला आव्हान दिले. तिने यानंतर पश्चिम बंगालच्या सुरभी पटवारी व पीएसपीबीच्या रीथ रिश्याला नमवित तिने अंतिम फेरी गाठली.