मनिका बत्राची ऐतिहासिक कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 06:53 AM2022-11-19T06:53:22+5:302022-11-19T06:53:45+5:30

Manika Batra: आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक देणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे.

Manika Batra's landmark performance | मनिका बत्राची ऐतिहासिक कामगिरी

मनिका बत्राची ऐतिहासिक कामगिरी

googlenewsNext

बॅकाँक : आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक देणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे. जागतिक क्रमवारीत ४४ व्या स्थानी असलेल्या मनिकाने २३व्या मानांकित चायनीज तायपेईच्या चेनला ४-३ ने नमवत भारतासाठी इतिहास घडवला. याआधी चीनच्या सातव्या मानांकित चेन जिंगटोंगला हरवत मनिकाने मोठा उलटफेर केला होता.
उपांत्य सामना अटीतटीचा ठरला. आपल्यापेक्षा सरस खेळाडूला पराभूत करत मनिकाने संयम आणि आक्रमकतेचा ताळमेळ साधत हा सामना ६-११, ११-६, ११-५, ११-७, ८-११, ९-११, ११-९ असा जिंकला.

Web Title: Manika Batra's landmark performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.