युवा टेबल टेनिसपटू मनिका बात्राची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 05:25 PM2018-04-20T17:25:57+5:302018-04-20T17:25:57+5:30
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मनिकाने नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे प्रतिष्ठीत अर्जुन पुरस्कारासाठी टेबल टेनिस महासंघाने तिची शिफारस केली आहे.
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची युवा टेबल टेनिसपटू मनिका बात्राने तब्बल चार पदकांना गवसणी घातली होती. त्यामुळे यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी तिची शिफारस करण्यात आली आहे.
भारतीय टेबल टेनिस महासंघाने याबाबत म्हटले आहे की, " राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मनिकाने नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे प्रतिष्ठीत अर्जुन पुरस्कारासाठी आम्ही तिची शिफारस केली आहे. "
#ManikaBatra writes #TeamIndia 's Table Tennis history in Gold 🥇🥇🥈
— IOA - Team India (@ioaindia) April 14, 2018
Running out of words of appreciation for the young talent & the extraordinary skills she possess! #Congratulations on the historic win & achievements in #GC2018TableTennis at the #GC2018#CommonwealthGames 👏 pic.twitter.com/yaxL7dAtL5
मनिकाने भारताला सांघिक गटात सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यानंतर महिला एकेरी विभागात सुवर्णपदक जिंकत मनिकाने इतिहास रचला होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली होती. मनिकाने मौमा दासबरोबर महिला दुहेरीत रौप्यपदक पटकावले होते, त्याचबरोबर मिश्र दुहेरीमध्ये कांस्यपदक पटकावले होते.