सिमकार्डवर सरकारची मोठी कारवाई, १ कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 01:05 PM2024-09-11T13:05:14+5:302024-09-11T13:05:45+5:30

आता फ्रॉड मोबाईल कनेक्शनवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

1 Crore Mobile Connection Disconnect Sim Card Users Do Not Repeat These Mistakes | सिमकार्डवर सरकारची मोठी कारवाई, १ कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद, कारण...

सिमकार्डवर सरकारची मोठी कारवाई, १ कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद, कारण...

नवी दिल्ली : फ्रॉड रोखण्यासाठी सरकारकडून नवनवीन पावले उचलली जात आहेत. आता फ्रॉड मोबाईल कनेक्शनवर कडक कारवाई करण्यात आली आहे. संचार साथीच्या मदतीनं फ्रॉड नंबर ओळखून ते बंद करण्यात आल्याची माहिती दूरसंचार मंत्रालयाने दिली आहे. दूरसंचार सेवा सुधारण्यासाठी ट्राय (TRAI) आणि दूरसंचार विभागाने (DoT) हा निर्णय घेतला आहे. 

मंगळवारी एक निवेदन देताना मंत्रालयाने नेटवर्क अव्हेलेबिलिटी, कॉल ड्रॉप रेट्स आणि पॅकेट ड्रॉप रेट्सला हायलाइट केले आहेत. ते सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही सांगण्यात आले. आतापर्यंत १ कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी ट्रायने टेलिकॉम ऑपरेटर्सना कनेक्शन बंद करण्यास आणि ब्लॅकलिस्टिंग करण्यास सांगितले होते. यामध्ये रोबो कॉल्स आणि प्री-रेकॉर्डेड कॉल्सचाही समावेश होता. 

दरम्यान, अलिकडच्या काळात जवळपास साडेतीन लाख नंबर्स बंद झाले आहेत. यामध्ये ५० संस्थांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. सुमारे ३.५ लाख अनव्हेरिफाइड एसएमएस हेडर आणि १२ लाख कंटेंट टेम्प्लेट्सला ब्लॉक कण्यात आले आहे. याशिवाय, १२ लाख कंटेंट टेम्प्लेट्सही ब्लॉक करण्यात आले आहेत.

संचार साथीच्या मदतीने जवळपास २.२७ लाख मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यात आले होते. या सर्वांचा सायबर गुन्ह्यात आणि आर्थिक फसवणुकीत सहभाग होता. दरम्यान, नेटवर्क सुधारण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाकडूनही सातत्याने काम केले जात आहे. ट्रायनेही नियमात सुधारणा केली आहे. मात्र, त्यानंतरही नेटवर्कमध्ये ओळख पटवली जात आहे. हे नियम १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू करण्यात आले होते.

तुम्ही काय करू नका?
तुमचा वैयक्तिक मोबाईल नंबर इतर गोष्टींसाठी वापरू नका. यामध्ये प्रमोशनल कॉल्सचाही समावेश आहे. आपण ते वापरू नये. असे केल्याने तुम्ही टेलिकॉम कंपन्यांच्या हिटलिस्टमध्येही येऊ शकता आणि तुमचा नंबर ब्लॉकही होऊ शकतो.
 

Web Title: 1 Crore Mobile Connection Disconnect Sim Card Users Do Not Repeat These Mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.