जाणून घ्या व्हॉट्सअॅपमधील दहा नव्या फीचरबद्दल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 03:50 PM2018-03-16T15:50:11+5:302018-03-16T16:03:59+5:30
जाणून घ्या व्हॉट्सअॅपमधील या नव्या दहा फीचरबद्दल.
मुंबई- व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपचा सगळेच जण वारेमाप वापर करतात. दिवसेंदिवस व्हॉट्सअॅप अपडेट होताना दिसत असून विविध फीचर सामाविष्ट केले जात आहेत. जाणून घ्या व्हॉट्सअॅपमधील या नव्या दहा फीचरबद्दल.
1- एक महिन्याच्या तपासणीनंतर व्हॉट्सअॅपने पेमेंट फीचर अॅड केलं आहे. एन्ड्रॉइड व आयओएस युजर्संना हे फीचर वापरता येईल. या फीचरच्या माध्यमातून युजर्सला पैसे पाठविता व स्विकारता येतील. व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठविण्यासाठी व स्विकारण्यासाठी युजर व रिसिव्हर दोघांकडे युपीआय पेमेंट ऑप्शन असणं गरजेचं आहे.
2- व्हॉट्सअॅपने डिलीट फॉर एव्हरीवन हे नवं फीचर आणलं आहे. चुकीने पाठविलेला मेसेज डिलीट करणं यामुळे शक्य होणार आहे. पाठविलेला मेसेज डिलीट करण्यासाठी युजरला मेसेजवर क्लिक करून तो डिलीट करायचा आहे. त्यासाठी डिलीट फॉर एव्हरीवन या ऑप्शनवर क्लिक करावं. सुरूवातीला मेसेज डिलीट करण्यासाठी सात मिनिटाच्या वेळेची मर्यादा होती पण आता 68 मिनिटांमध्ये मेसेज डिलीट करता येतो.
3- व्हॉट्सअॅप सुरू झाल्यापासून व्हॉट्सअॅप ग्रुप ही संकल्पना सुरू झाली. शाळेतील मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच जण ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले. आधी मर्यादीत मेंम्बर्स ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकत होते. पण आता ही मर्यादा वाढविण्यात आली आहे. आता 500 जण ग्रुपमध्ये अॅड करता येतात. विशेष म्हणजे अॅडमिन व्यतिरिक्त इतरही ग्रुपमधील व्यक्ती ग्रुपमध्ये अॅड होऊ शकतात.
4- व्हॉट्सअॅपने व्हिडीओ कॉलचं फीचर आणलं. या फीचरला मिळालेल्या प्रतिसादानंतर व्हॉट्सअॅपने ग्रुप व्हिडीओ कॉलिंग सुरू केलं. त्यामुळे युजर्सला आता त्यांना हवी असलेली व्यक्ती व्हिडीओ कॉलमध्ये अॅड करता येईल.
5- व्हॉट्सअॅपने व्यावसायिकांसाठीही फीचर आणलं आहे. यामध्ये तुमचा व्यावसाय प्रमोट करणं शक्य झालं आहे. या फीचरच्या माध्यमातून बिझिनेस प्रोफाइल वेरिफाइड होत असून त्यावरून ग्राहकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांच्या तक्रारींचं निवारण व बदल सांगितले जातात.
6- व्हॉट्सअॅपने आणलेल्या या फीचरमध्ये तुम्हाला तुमच्या फोटोवर लोकेशन आणि टाइम स्टिकर फोटो शेअर करताना वापरता येतील. यासाठी युजर्सला गॅलेरीतील फोटो निवडून तो व्हॉट्सअॅपवर शेअर करताना स्माइलीज अॅड करायचा आहेत. तसंच वेळ व ठिकाणासाठीही करायचं आहे.
7- व्हॉट्सअॅपच्या व्हिडीओ व व्हॉइस कॉलसेवेला युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे व्हिडीओ कॉलवरून व्हॉइस कॉलवर स्विच होण्याचं नवं फीचर तयार केलं आहे. व्हिडीओ कॉल सुरू असताना तुम्ही व्हॉइस कॉलवर स्विच होऊ शकता.
8- व्हॉट्सअॅपने अॅपलचे काही नियमही फीचरमध्ये आणले आहेत. अॅपलच्या कारप्ले तंत्रज्ञानाच्या सपोर्टने आणण्यात आले आहेत.
9- व्हॉट्सअॅप व युट्यूबच्या एकत्रिकरणामुळे युट्यूबवरील व्हॉट्सअॅपवर आलेले व्हिडीओ तुम्ही थेट चॅट बॉक्समध्ये पाहू शकता. त्यासाठी तुमच्या व्हॉट्सअॅप चॅटबॉक्सवर आलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ती लिंक चॅटबॉक्समध्येच सुरू होइल व तुम्हाला व्हिडीओ पाहता येईल.
10- व्हॉट्सअॅपचा आयकॉन फीचरही नवा आहे. यामध्ये व्हॉट्सअॅपचा लोगो तुम्हाला हव्या त्या आकारात करून घेता येईल.