बापरे! हॅकिंगसाठी 'या' 10 प्रसिद्ध स्मार्टफोन्सचा केला जातोय वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 03:43 PM2019-11-11T15:43:49+5:302019-11-11T15:48:58+5:30

हॅकर्स स्मार्टफोन हॅक करून युजर्सचा डेटा चोरत असल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. 10 प्रसिद्ध अँड्रॉईड स्मार्टफोनला आता हॅकिंगचा फटका बसला आहे.

10 popular android smartphones that can be used for snooping after hacking | बापरे! हॅकिंगसाठी 'या' 10 प्रसिद्ध स्मार्टफोन्सचा केला जातोय वापर

बापरे! हॅकिंगसाठी 'या' 10 प्रसिद्ध स्मार्टफोन्सचा केला जातोय वापर

Next
ठळक मुद्दे10 प्रसिद्ध अँड्रॉईड स्मार्टफोनला आता हॅकिंगचा फटका बसला आहे.स्मार्टफोनला हॅक करुन त्यातील माहितीची हेरगिरी केली जाऊ शकते. अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये AT कमांडची मदत घेतली जाते.

नवी दिल्ली - टेक्नॉलॉजीच्या जगात हॅकिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हॅकिंगचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. हॅकर्स स्मार्टफोन हॅक करून युजर्सचा डेटा चोरत असल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. 10 प्रसिद्ध अँड्रॉईड स्मार्टफोनला आता हॅकिंगचा फटका बसला आहे. हे स्मार्टफोनला हॅक करुन त्यातील माहितीची हेरगिरी केली जाऊ शकते अशी धक्कादायक माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. 

सिक्यॉरिटी रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, ब्लूटूथ आणि यूएसबीचा वापर करुन हेरगिरी केली जाऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. यासाठी अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये AT कमांडची मदत घेतली जाते. बेसबँड सॉफ्टवेअरशी कम्युनिकेट करण्यासाठी अँड्रॉईडमध्ये AT कमांडचा वापर केला जातो. रिपोर्टनुसार, हॅकर्स IMEI आणि IMSI नंबर मिळवण्यासाठी, फोन कॉल रोखण्यासाठी, हे फोन कॉल्स इतर नंबरवर वळवण्यासाठी, कॉलिंग फीचर ब्लॉक करण्यासाठी आणि इंटरनेट बंद करण्यासाठी या ट्रिकचा वापर करू शकतात. या रिपोर्टमध्ये 10 प्रसिद्ध अँड्रॉईड फोनचीही यादी देण्यात आली आहे ज्याचा वापर हॅकर्स करू शकतात. 

टेक वेबसाईट TechCrunch ने दिलेल्या रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S8+, Samsung Galaxy S3, Samsung Note 2, Huawei P8 Lite, Huawei Nexus 6P, Google Pixel 2, LG G3, LG Nexus 5, Motorola Nexus 6 आणि HTC Desire 10 Lifestyle या दहा स्मार्टफोन्सचा समावेश आहे.  सर्व स्मार्टफोनमध्ये एक बेसबँड प्रोसेसर (सेल्युलर मॉडेम) आणि अ‍ॅप्लिकेशन प्रोसेसर (AP) असतो. AP एक साधारण प्रोसेसर आहे, तर बेसबँड प्रोसेसरचा वापर सेल्युलर कनेक्टिव्हीटीसाठी रेडिओ संबंधी कामासाठी होतो. 

अ‍ॅप्लिकेशन प्रोसेसरकडून बेसबँड प्रोसेसरला कनेक्ट होण्यासाठी AT कमांड जारी केली जाते. जेव्हा स्मार्टफोन Apps आणि फोनमधील इतर फीचर्सवर AT कमांड पाठवण्यासाठी अडथळा येतो, तेव्हा अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये यूएसबी आणि ब्लूटूथला यात अ‍ॅक्सेस दिला जातो. हॅकर्सकडून याच टेक्निकचा वापर केला जातो. 14 पेक्षा जास्त AT कमांड आहेत, ज्याद्वारे फोन हॅक केला जाऊ शकतो, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

केवळ टायपिंगचा आवाज ऐकून हॅकर्स पासवर्ड हॅक करू शकतात अशी नवी माहिती आता समोर आली आहे. साऊंडवेव्सच्या मदतीने या गोष्टी केल्या जातात. स्मार्टफोनच्या कीबोर्डवर युजर्स टाईप करतात तेव्हा त्यातून काही साऊंडवेव बाहेर येतात. टायपिंगच्या वेळी स्क्रीनवर येणाऱ्या प्रत्येक स्ट्रोकचं वेगळं व्हायब्रेशन असतं. मात्र हे व्हायब्रेशन कानाला ऐकू येत नाही. हॅकर्स साऊंडवेवच्या मदतीने पासवर्ड हॅक करतात. टायपिंगचं व्हायब्रेशन ते अ‍ॅप्सच्या मदतीने ऐकू शकतात. काही खास अ‍ॅप्स आणि अल्गोरिदमने स्मार्टफोनवरून तयार होणाऱ्या साऊंडवेव ऐकता आणि डीकोड करता येतात. रिसर्चर्सनी 45 लोकांना मॅलवेअर असलेला स्मार्टफोन वापरण्यासाठी दिला होता. मॅलवेअर एका अ‍ॅपमध्ये होतं. त्यानंतर या सर्व लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी उभं करून फोनमध्ये टेक्स्ट एंटर करायला सांगितला. टायपिंग दरम्यान मॅलवेअर अ‍ॅपने प्रत्येक कीस्ट्रोकवरून निर्माण झालेल्या वेव अगदी सहजपणे रेकॉर्ड केल्या.

 

Web Title: 10 popular android smartphones that can be used for snooping after hacking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.