108MP Camera आणि दमदार प्रोसेसरसह Moto G200 होणार लाँच; पुढील महिन्यात होऊ शकतो सादर
By सिद्धेश जाधव | Published: October 26, 2021 04:48 PM2021-10-26T16:48:03+5:302021-10-26T16:48:14+5:30
New 108MP Camera Phone Moto G200: Moto G200 स्मार्टफोन चीनमध्ये Motorola Edge S30 नावाने सादर केला जाऊ शकतो. हा फोन Snapdragon 888 चिपसेट आणि 144Hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाईल.
गेल्या महिन्यात मोटोरोलाने आपली ‘एज’ सीरिज सादर केली होती. भारतासह जगभरात सादर झालेल्या या सीरिजमध्ये कंपनीने 108MP रिजोल्यूशन असलेल्या कॅमेऱ्याचा वापर केला होता. ही एक मिडरेंज सीरिज होती. आता कंपनीने Moto G200 या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहे. हा फोन Snapdragon 888 चिपसेट आणि 144Hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाईल. हा फोन चीनमध्ये नोव्हेंबरमध्ये सादर केला जाऊ शकतो. Moto G200 स्मार्टफोन चीनमध्ये Motorola Edge S30 नावाने सादर केला जाऊ शकतो.
Moto G200 चे लीक स्पेसिफिकेशन्स
प्रसिद्ध टिपस्टर इव्हान ब्लासने Moto G200 च्या कोडनेम युकोनची माहिती दिली होती. आता टेक्निक न्यूजने या फोनच्या काही स्पेसीफाकेशन्सचा खुलासा केला आहे. मिलेल्या माहितीनुसार Moto G200 मध्ये एक FHD+ रिजोल्यूशन असलेला OLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 चिपसेटसह 8GB रॅम दिला जाऊ शकतो. हा फोन जुन्या Android 11 सह सादर केला जाऊ शकतो/
फोटोग्राफीसाठी Moto G200 मध्ये Samsung चा S5KHM2 108MP सेन्सर दिला जाऊ शकतो. हा कॅमेरा सेन्सर 4K व्हिडीओ 120fps वर आणि 8K व्हिडीओ 24fps वर रेकॉर्ड करण्यास सक्षम असेल. त्याचबरोबर 13MP अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सरसह देखील कंपनी देऊ शकते. या फोनच्या फ्रॉन पॅनलवर 16MP सेल्फी शुटर मिळेल.