108MP Camera असलेल्या Redmi च्या झक्कास फोनची एंट्री; डिजाईन पाहताच म्हणाल- ‘किती मस्त आहे..’
By सिद्धेश जाधव | Published: February 9, 2022 04:28 PM2022-02-09T16:28:28+5:302022-02-09T16:29:27+5:30
108MP Camera Phone Xiaomi Redmi Note 11s: Xiaomi Redmi Note 11s स्मार्टफोन भारतात 8GB RAM, MediaTek Helio G96 चिपसेट, 108MP Camera आणि 5,000mAh Battery सह सादर करण्यात आला आहे.
Xiaomi नं आपल्या रेडमी नोट सीरीजमध्ये Redmi Note 11S आणि Xiaomi Redmi Note 11 असे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. हे दोन्ही फोन किफायतशीर किंमतीत आर्कषक लुक आणि जबरदस्त स्पेक्ससह सादर करण्यात आले आहेत. यातील Redmi Note 11s स्मार्टफोन भारतात 8GB RAM, MediaTek Helio G96 चिपसेट, 108MP Camera आणि 5,000mAh Battery सह सादर करण्यात आला आहे.
Xiaomi Redmi Note 11S
हा फोन 6.43 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. ज्यात पंच-होल डिजाईनसह 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. सोबत कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देखील मिळते. हा हँडसेट अँड्रॉइड 11 बेस्ड मीयुआय 13 वर चालतो.
प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी96 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम मिळतो जो एक्सपांडेबल रॅम टेक्नॉलॉजीच्या मदतीनं 11GB पर्यंत वाढवता येतो. रेडमी नोट 11एस मध्ये 128GB पर्यांतची स्टोरेज मिळते. हेवी गेम्स खेळताना मोबाईलचं तापमान कमी राहावं म्हणून यात लिक्विड कूल टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
Redmi Note 11S मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप 108 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह देण्यात आला आहे. सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या रेडमी डिवाइसमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
ड्युअल सिम Redmi Note 11S मध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स तर मिळतात सोबत आयआर ब्लास्टर देण्यात आला आहे. तसेच साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुरक्षा मिळते. हा एक आयपी53 सर्टिफाइड फोन आहे त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 11एस स्मार्टफोनमध्ये 33वॉट प्रो फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
Redmi Note 11S ची किंमत
रेडमी नोट 11एस चे तीन व्हेरिएंट्स 16 फेब्रुवारीपासून Horizon Blue, Polar White आणि Space Black कलरमध्ये विकत घेता येतील.
- Redmi Note 11S 6GB/64GB: 16,499 रुपये
- Redmi Note 11S 6GB/128GB: 17,499 रुपये
- Redmi Note 11S 8GB/128GB; 18,499 रुपये
हे देखील वाचा:
- Vivo चा सर्वात फास्ट आणि स्लिम 5G Smartphone लाँच; कमी किंमतीत 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा
- हे आहेत 6 'बेस्ट' पासवर्ड मॅनेजर अॅप्स जे तुम्हाला कधीच विसरू देणार नाहीत महत्वाचे लॉगिन डिटेल्स