PUBG ने पुन्हा घेतले बळी; दहावीच्या दोन मुलांना ट्रेनने उडवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 07:52 PM2021-11-22T19:52:07+5:302021-11-22T19:52:46+5:30
PUBG UP Teens Train Accident: PUBG Game खेळण्यात व्यस्त असेलल्या दोन किशोरवयीन मुलांना त्यांचे प्राण गमवावे लागेल आहेत.
गेम्स अनेकदा जीवघेणे ठरतात. या गेम्समधील स्पर्धांमुळे मित्रामित्रांमध्ये भांडणं होतात. अशा बातम्यांमध्ये PUBG Mobile चे नाव बऱ्याचदा झळकते. या गेमचे व्यसन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना लागले आहे. परंतु हे व्यसन देखील जीवघेणे ठरते. पबजी संबंधित एक मोठी बातमी मथुरेतून समोर आली आहे. जिथे PUBG Game खेळण्यात व्यस्त असेलल्या दोन किशोरवयीन मुलांना प्राण गमवावे लागेल आहेत.
ट्रेनखाली आल्यामुळे झाला मृत्यू
उत्तरप्रदेशमधील मथुरा येथील दोन मुलांचा ट्रेनच्या धडकेमुळे मृत्यू झाला आहे आणि या अपघाताला पबजी कारणीभूत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. जिथे ही घटना घडली तिथे पोलिसांना मिळलेल्या मृतांच्या मोबाईल फोनमध्ये PUBG Game चालू असल्याचे आढळले. त्यावरून दोघेही पबजीमध्ये व्यस्त असल्यामुळे ट्रेन खाली आल्याचा अंदाज लावला जात आहे.
गौरव आणि कपिल कुमार अशी त्या दोन मुलांची नावे आहेत. ते दोघे 14 वर्षांचे होते आणि दहावीच्या वर्गात होते. दोघेही एकाच कॉलोनीमध्ये राहत होते आणि दुर्घटनेच्या दिवशी सकाळी मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडले होते. परंतु चालण्याच्या ऐवजी दोघेही मोबाईल गेम खेळण्यात व्यस्त झाले.
गौरव पहिल्यांदाच मॉर्निग वॉकला गेला होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे. या दुर्घटनेचे कोणतेही साक्षीदार पोलिसांना सापडले नाहीत. परंतु फोनमध्ये PUBG चालू असल्यामुळे या दोघांचा अपघात गेम खेळण्यामुळे झाल्याचा अंदाज लावला जात आहे.