पालकांनो सावधान! ऑनलाइन गेमपासून मुलांना ठेवा दूर; 12 वर्षांच्या मुलाने चोरले 3.22 लाख रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 03:33 PM2021-06-29T15:33:28+5:302021-06-29T15:34:45+5:30

12 Year Old Boy stole Money For Free Fire: छत्तीसगडमधील कांकेर येथील एका महिलेच्या 12 वर्षीय मुलाने गेम अपग्रेड करण्यासाठी आईच्या बँक अकॉउंटमधून 3.22 लाख खर्च केले.

12 year boy spend 3 22 lakhs to upgrade free fire game  | पालकांनो सावधान! ऑनलाइन गेमपासून मुलांना ठेवा दूर; 12 वर्षांच्या मुलाने चोरले 3.22 लाख रुपये 

हा प्रतीकात्मक फोटो आहे.

Next

आजकालची मुलं खूप अ‍ॅडव्हान्स आहेत असे आपण नेहमीच म्हणतो. ते स्मार्टफोन्स, अ‍ॅप्स किंवा इतर कोणत्याही टेक्नॉलॉजी संबंधित गोष्टीत आपल्यापेक्षा जास्त सहज आणि चांगल्या पद्धतीने हाताळतात. परंतु कधी कधी मुलांची हीच हुशारी पालकांना भारी पडते. अशीच एक घटना छत्तीसगडमध्ये समोर आली आहे. छत्तीसगडमधील कांकेर येथील एका महिलेच्या 12 वर्षीय मुलाने गेम अपग्रेड करण्यासाठी आईच्या बँक अकॉउंटमधून 3.22 लाख खर्च केले. विशेष म्हणजे या 278 ट्रँजॅक्शन्सचे एसएमएस देखील मिळाले नाहीत.  

या महिलेचा 12 वर्षांचा मुलगा ऑनलाइन मोबाईल गेम फ्री फायर खेळत होता. हा गेम पबजी मोबाईल प्रमाणेच खूप लोकप्रिय गेम आहे. हा गेम खेळत असताना या मुलाने गेममध्ये अपडेटेड शस्त्र विकत घेण्यासाठी त्याने 3.22 लाख रुपये खर्च केले. जेव्हा ही महिला पैसे काढण्यासाठी एटीएमवर गेली तेव्हा तिला समजले कि तिच्या अकॉउंटमध्ये फक्त 9 रुपये उरले आहेत.  

अकॉउंटमध्ये 9 रुपये पाहिल्यानंतर महिलेने पोलिसांकडे ऑनलाइन फ्रॉडची तक्रार केली. त्यावेळी महिलेने सांगितले कि अकॉउंटमधून पैसे डेबिट झाल्याचा कोणताही मेसेज तिला आला नाही. इतकेच काय तर OTP देखील आला नाही.  

तापास केल्यावर समजले कि, 8 मार्च ते 10 जून दरम्यान 3 महिन्यात महिलेच्या खात्यावरून 278 ट्रँजॅक्शन्स करण्यात आले. यातून 3 लाख 22 हजार रुपये काढण्यात आले. हे पैसे गेम खेळण्यासाठी आणि शस्त्र अपग्रेड करण्यासाठी वापरण्यात आले आहेत. तेव्हा महिलेच्या लक्षात आले कि तिच्या मुलाने गेम खेळण्यासाठी पैसे खर्च केले आहेत. त्यानंतर 12 वर्षाच्या मुलाने सांगितले कि त्याने ऑनलाइन गेम फ्री-फायर मधील शस्त्र अपग्रेड करण्यासाठी आईचा मोबाईल नंबर बॅंक अकॉउंटशी लिंक करून गेममधील अपग्रेड खरेदी केले.  

Web Title: 12 year boy spend 3 22 lakhs to upgrade free fire game 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.