12GB च्या जबरदस्त RAM आणि वेगवान स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह OnePlus 9 RT वेबसाईटवर लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Published: October 4, 2021 03:28 PM2021-10-04T15:28:25+5:302021-10-04T15:29:28+5:30

Oneplus 9RT news: OnePlus 9 RT स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून हा फोन OnePlus MT2110 मॉडेल नंबरसह सादर केला जाईल असे समजले आहे.

12GB RAM Phone OnePlus 9 RT geekbench listing Snapdragon 888 SoC specs leaked  | 12GB च्या जबरदस्त RAM आणि वेगवान स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह OnePlus 9 RT वेबसाईटवर लिस्ट 

12GB च्या जबरदस्त RAM आणि वेगवान स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह OnePlus 9 RT वेबसाईटवर लिस्ट 

Next

वनप्लस मोबाईल आपल्या प्रीमियम अँड्रॉइड स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. कंपनी आपल्या आगामी स्मार्टफोनवर काम करत असल्याची बातमी गेले कित्येक दिवस चर्चेत आहे. लवकरच वनप्लसचा नवीन फोन 15 ऑक्टोबरला टेक मंचावर सादर केला जाऊ शकतो. हा डिवाइस OnePlus 9 RT नावाने बाजारात येईल. आता आता हा वनप्लस मोबाईल फोन अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्ससह गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. 

OnePlus 9 RT स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून हा फोन OnePlus MT2110 मॉडेल नंबरसह सादर केला जाईल असे समजले आहे. वनप्लस 9 आरटीच्या स्पेसीफिकेशन्सची माहिती देखील गीकबेंच लिस्टिंगमधून समोर आली आहे.  

OnePlus 9 RT गिकबेंच लिस्टिंग  

गीकबेंचनुसार हा फोन अँड्रॉइड 11 ओएससह बाजारात येईल. तसेच लिस्टिंगमधील कोडनेममधून हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसह सादर केला जाईल, असे समजले आहे. वनप्लसच्या या आगामी फ्लॅगशिप फोनमध्ये 12GB रॅम मिळेल, या पेक्षा जास्त व्हेरिएंटसह हा फोन बाजारात उपलब्ध होऊ शकतो. बेंचमार्किंग स्कोर पाहता, वनप्लस 9 आरटीला गीकबेंचवर सिंगल कोर टेस्टमध्ये 818 पॉईंट्स आणि मल्टी कोरमध्ये 3246 पॉईंट्स मिळाले आहेत.  

OnePlus 9 RT चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

लीक्स आणि रिपोर्ट्सनुसार, OnePlus 9 RT मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असेलला अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. यात अँड्रॉइड ओएस आधारित आक्सिजनओएस 12 सह बाजारात दाखल होईल. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. तसेच पॉवर बॅकअपसाठी वनप्लस 9 आरटी मध्ये 4,500एमएएचची बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह दिली जाऊ शकते.  

Web Title: 12GB RAM Phone OnePlus 9 RT geekbench listing Snapdragon 888 SoC specs leaked 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.