12GB RAM असलेल्या फोनवर 9 हजारांची सूट; पहिल्याच सेलमध्ये Poco चा फ्लॅगशिप स्मार्टफोन स्वस्तात
By सिद्धेश जाधव | Published: June 27, 2022 12:02 PM2022-06-27T12:02:50+5:302022-06-27T12:04:03+5:30
12GB RAM, Qualcomm Snapdragon 870 आणि 67W sonic charging असलेला Poco F4 5G स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरु होणार आहे.
पोकोच्या एफ सीरिजमध्ये फ्लॅगशिप लेव्हल स्मार्टफोन सादर केले जातात. त्यानुसार कंपनीनं 12GB RAM, Qualcomm Snapdragon 870 आणि 67W sonic charging असेलला Poco F4 5G स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतात लाँच केला होता. आज या हँडसेटचा पहिला सेल सुरु होणार आहे आणि या सेलमध्ये 9000 रुपये पर्यंतची सूट मिळत आहे.
Poco F4 5G ची किंमत
Poco F4 5G स्मार्टफोनचा 6GB रॅम 128GB मेमरी व्हेरिएंटची किंमत जरी 32,999 रुपये असली तरी फ्लिपकार्टवर हा डिवाइस 27,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. SBI क्रेडिट किंवा डेबिट कार्ड धारकांना 3000 रुपयांची सूट मिळेल. तसेच 1000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळेल. हा फोन ग्रीन आणि ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल.
POCO F4 5G चे स्पेसिफिकेशन्स
पोको एफ4 5जी फोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ई4 अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 1300निट्स ब्राईटनेस, 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. POCO F4 5G स्मार्टफोनच्या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे.
पोको एफ4 5जी अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा फ्लॅगशिप ग्रेड स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत एड्रेनो 650 जीपीयू आणि क्वॉलकॉम एक्स55 मॉडेम देण्यात आला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 RAM व 256 जीबी पर्यंतची UFS 3.1 Storage देण्यात आली आहे. टर्बो रॅम फिचरच्या मदतीनं 3GB पर्यंतचा व्हर्च्युअल रॅम वाढवता येतो.
फोटोग्राफीसाठी पोको एफ4 5जी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 67W sonic charging टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे.