12 वीच्या विद्यार्थ्याने बनवला झोप उडवणारा चष्मा; गाडी चालवताना ड्रायव्हरचा लागू नाही देणार डोळा

By सिद्धेश जाधव | Published: February 5, 2022 07:25 PM2022-02-05T19:25:49+5:302022-02-05T19:26:36+5:30

Goggles To Prevent Sleepiness: नवाब सुफियान शेखला हा चष्मा बनवण्यासाठी तीन महिने लागले. आपल्या ओळखीच्या लोकांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे त्याने हे काम हाती घेतलं होतं.

12th Student Sufiyan Nawab From Gujrat Invented Goggles To Prevent Sleepiness Keep Awake Driver Avoid Road Accident  | 12 वीच्या विद्यार्थ्याने बनवला झोप उडवणारा चष्मा; गाडी चालवताना ड्रायव्हरचा लागू नाही देणार डोळा

12 वीच्या विद्यार्थ्याने बनवला झोप उडवणारा चष्मा; गाडी चालवताना ड्रायव्हरचा लागू नाही देणार डोळा

googlenewsNext

रात्री गाडी चालवताना ड्रायव्हरचा डोळा लागल्यामुळे अनेक अपघात होत असतात. अशी घटना दिवसा देखील घडू शकते. यावर एक उपाय गुजरात मधील 12वीच्या एका विद्यार्थ्याने शोधला आहे. एक डुलकी मोठ्या अपघताचं कारण ठरू शकते, म्हणून ड्रायव्हरने जागृत राहणं आवश्यक आहे. यासाठीच एक भन्नाट चष्मा बनवण्यात आला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, गुजरातमधील सूरतमध्ये राहणाऱ्या नवाब सुफियान शेखने एक नवीन चष्मा बनवला आहे. सुफियान सध्या 12वीत शिकत आहे. त्याने बनवलेल्या चष्मा वापरून गाडी चालवल्यास ड्रायव्हरला झोप येणार नाही. डोळे मिटू लागलेच तर हा चष्मा ड्रायव्हरला अलर्ट करून जागा करेल. आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून या चष्म्याचा शोध लावला असल्याचं सुफियाननं सांगितलं आहे.  

ड्रायव्हरची झोप उडवणारा चष्मा  

नवाब सुफियान शेखला हा चष्मा बनवण्यासाठी तीन महिने लागले. आपल्या ओळखीच्या लोकांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे त्याने हे काम हाती घेतलं होतं. यासाठी त्याला फक्त 900 रुपयांचा खर्च आला आहे. चष्म्याच्या डावीकडे इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे तर उजव्या बाजूला बॅटरी देण्यात आली आहे. डाव्या लेन्सवर असलेला सेन्सर ड्रायव्हरच्या डोळ्यांवर लक्ष ठेऊन असतो. जेव्हा डोळे बंद होत आहेत असे सेन्सरला समजते तेव्हा तो अलार्म वाजवतो. हा अलर्ट ड्रायव्हरसह आजूबाजूच्या लोकांना देखील ऐकू येतो.  

हे देखील वाचा:

इंटरनेटविना जाणून घ्या तुमचा PF अकाऊंटचा बॅलेन्स, फॉलो करा सोप्प्या स्टेप्स

यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट

Web Title: 12th Student Sufiyan Nawab From Gujrat Invented Goggles To Prevent Sleepiness Keep Awake Driver Avoid Road Accident 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.