१५० कोटी Twitter युजर्संना फटका, खाते बंद करणार; इलाॅन मस्क यांचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 07:00 AM2022-12-10T07:00:15+5:302022-12-10T07:00:39+5:30

मस्क यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल १५० काेटी म्हणजेच सुमारे दीड अब्ज खाती हटविण्यात येणार आहे.

150 crore Twitter accounts will be closed; Elon Musk's big decision | १५० कोटी Twitter युजर्संना फटका, खाते बंद करणार; इलाॅन मस्क यांचा मोठा निर्णय

१५० कोटी Twitter युजर्संना फटका, खाते बंद करणार; इलाॅन मस्क यांचा मोठा निर्णय

googlenewsNext

न्यूयाॅर्क : ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर नवे मालक इलाॅन मस्क यांनी कंपनीमध्ये माेठे बदल केले आहेत. आता ते आणखी एक माेठे पाऊल उचलणार आहेत. ट्विटरवरील काेट्यवधी खाती ते हटविणार आहेत. 

मस्क यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल १५० काेटी म्हणजेच सुमारे दीड अब्ज खाती हटविण्यात येणार आहे. ही सर्व खाती केवळ नावापुरतीच आहे. अनेक वर्षांपासून त्यात लाॅगइन झालेले नाही आणि काेणतेही ट्वीटही करण्यात आलेले नाही, असे मस्क यांनी ट्वीटमधून सांगितले. 

एवढ्या माेठ्या संख्येने निष्क्रिय खाती हटविल्यामुळे नेम स्पेस माेकळी हाेईल. एखाद्याला एक विशिष्ट युझरनेम हवे आहेत. मात्र, ते काेणी आधीच घेतलेले आहे आणि त्याचा वापरच हाेत नाही. असे खाते हटविल्यामुळे ते नाव उपलब्ध हाेईल. 

Web Title: 150 crore Twitter accounts will be closed; Elon Musk's big decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.