5 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणाऱ्या फोनचा पहिला सेल आज; OnePlus 10R वर मिळतायत अनेक ऑफर्स
By सिद्धेश जाधव | Published: May 4, 2022 12:57 PM2022-05-04T12:57:05+5:302022-05-04T12:57:17+5:30
150W सुपरफास्ट चार्जिंग असलेल्या OnePlus 10R स्मार्टफोन आजपासून खरेदी करता येणार आहे.
OnePlus 10R स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतात लाँच झाला होता. हा फोन दोन स्टोरेज, दोन चार्जिंग आणि दोन बॅटरी ऑप्शनसह सादर करण्यात आला आहे. आज अर्थात 4 मेपासून या हँडसेटची विक्री सुरु होणार आहे. पहिल्याच सेलमध्ये 12GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, आणि मीडियाटेक डिमेनसिटी 8100 मॅक्स चिपसेट असलेला हा डिवाइस ऑफर्ससह विकत घेता येईल.
OnePlus 10R चे स्पेसिफिकेशन्स
प्रोसेसिंगसाठी कंपनीनं मीडियाटेक डिमेनसिटी 8100 मॅक्स चिपसेटचा वापर केला आहे. एआयनाही मीडियाटेक एपीयू 580 आणि ग्राफिक्ससाठी माली-जी610 जीपीयू आहे. हा अँड्रॉइड 12 बेस्ड आक्सिजन ओएस 12.1 वर चालतो. चांगल्या परफॉर्मन्ससाठी 3D Passive Cooling System आणि HyperBoost Gaming Engine असे फीचर्स देखील आहेत.
फोटोग्राफीसाठी वनप्लस 10आर स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
वनप्लस 10आर स्मार्टफोन 6.7 इंचाचा फ्लुइड अॅमोलेड डिस्प्लेहं बाजारात आला आहे. ज्यात 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 720हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 1000हर्ट्ज रिस्पांस रेट मिळतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा डिवाइस कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. तसेच 394पीपीआय, 10बिट कलर एचडीआर10+ इत्यादी फीचर्स देखील आहेत.
वनप्लस 10आर च्या एका मॉडेलमध्ये 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. जी 32 मिनिटांत फुल चार्ज होते. तर 150W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 4,500एमएएच बॅटरी असलेला आणखी एक मॉडेल सादर करण्यात आला आहे. जो फक्त 5 मिनिटांत 50 टक्के तर 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो.
OnePlus 10R ची किंमत आणि ऑफर्स
हा Amazon आणि OnePlus च्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येईल. फोनच्या 8GB/128GB (80W) व्हेरिएंटची किंमत 38,999 रुपये आहे. तर, 12GB/256GB (80W) ची किंमत 42,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 12GB/256GB (150W) व्हेरिएंट 43,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनवर ICICI बँकेच्या कार्ड धारकांना 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येईल. तसेच जुना फोन एक्सचेंज करून 2,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल.