3 मिनिटांत 30 टक्के चार्जिंग! शक्तिशाली प्रोसेसर, 12GB रॅम व 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus 10R आला  

By सिद्धेश जाधव | Published: April 29, 2022 12:45 PM2022-04-29T12:45:28+5:302022-04-29T12:46:10+5:30

150W SuperVOOC फास्ट चार्जिंग, 12GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि मीडियाटेक डिमेनसिटी 8100 मॅक्स चिपसेट असलेला OnePlus 10R ची भारतात एंट्री झाली आहे.

150W Fast Charging Featured OnePlus 10R Launched In India   | 3 मिनिटांत 30 टक्के चार्जिंग! शक्तिशाली प्रोसेसर, 12GB रॅम व 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus 10R आला  

3 मिनिटांत 30 टक्के चार्जिंग! शक्तिशाली प्रोसेसर, 12GB रॅम व 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus 10R आला  

Next

वनप्लसनं एकीकडे भारतात आपला सर्वात स्वस्त डिवाइस OnePlus Nord CE 2 Lite 5G उतरवला आहे. तर दुसरीकडे शक्ती प्रदर्शन करत OnePlus 10R देखील सादर केला आहे. हा डिवाइस 150W SuperVOOC फास्ट चार्जिंगमुळे ग्राहकांचं लक्ष वेधून घेतो. परंतु 12GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, आणि मीडियाटेक डिमेनसिटी 8100 मॅक्स चिपसेट 5G प्रोसेसर याची ताकद आणखी वाढवतात.  

OnePlus 10R चे स्पेसिफिकेशन्स  

प्रोसेसिंगसाठी कंपनीनं मीडियाटेक डिमेनसिटी 8100 मॅक्स चिपसेटचा वापर केला आहे. एआयनाही मीडियाटेक एपीयू 580 आणि ग्राफिक्ससाठी माली-जी610 जीपीयू आहे. हा अँड्रॉइड 12 बेस्ड आक्सिजन ओएस 12.1 वर चालतो. चांगल्या परफॉर्मन्ससाठी 3D Passive Cooling System आणि HyperBoost Gaming Engine असे फीचर्स देखील आहेत. 

फोटोग्राफीसाठी वनप्लस 10आर स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

वनप्लस 10आर स्मार्टफोन 6.7 इंचाचा फ्लुइड अ‍ॅमोलेड डिस्प्लेहं बाजारात आला आहे. ज्यात 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 720हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 1000हर्ट्ज रिस्पांस रेट मिळतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा डिवाइस कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. तसेच 394पीपीआय, 10बिट कलर एचडीआर10+ इत्यादी फीचर्स देखील आहेत.  

वनप्लस 10आर च्या एका मॉडेलमध्ये 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. जी 32 मिनिटांत फुल चार्ज होते. तर 150W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 4,500एमएएच बॅटरी असलेला आणखी एक मॉडेल सादर करण्यात आला आहे. जो फक्त 3 मिनिटांत 30 टक्के तर 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो.  

OnePlus 10R ची किंमत 

  • OnePlus 10R 80W 8GB/128GB: 38,999 रुपये  
  • OnePlus 10R 80W 12GB/256GB: 42,999 रुपये  
  • OnePlus 10R 150W 12GB/256GB: 43,999 रुपये  

हा फोन 4 मेपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. 

 

Web Title: 150W Fast Charging Featured OnePlus 10R Launched In India  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.