चुटकीसरशी फुल चार्ज होणारा Realme फोन येतोय भारतात; सीईओनी सांगितली तारीख
By सिद्धेश जाधव | Published: April 18, 2022 12:16 PM2022-04-18T12:16:17+5:302022-04-18T12:17:13+5:30
Realme GT Neo 3 मध्ये मीडियाटेकचा नवा फ्लॅगशिप प्रोसेसर मिळतो. तसेच यातील 150W फास्ट चार्जिंग फक्त 5 मिनिटांत 50 टक्के फोन चार्ज करते.
Realme GT Neo 3 स्मार्टफोन भारतातील एक बहुप्रतीक्षित डिवाइस आहे. यामागे या स्मार्टफोनमधील 150W फास्ट चार्जिंग हे प्रमुख कारण आहे. Realme नं काही दिवसांपूर्वी आपल्या होम मार्केट चीनमध्ये फक्त 5 मिनिटांत 50% चार्ज होणारा Realme GT Neo 3 लाँच केला होता. आता Realme चे CEO माधव सेठ यांनी या वेगवान चार्जिंग असलेल्या डिवाइसच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे.
आस्क माधव या सीरिजच्या एका भागात माधव सेठ यांनी Realme GT Neo 3 स्मार्टफोन भारतात 29 एप्रिलला लाँच होईल, असं सांगितलं आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस देशात सर्वात वेगवान चार्जिंग स्पीड असलेला स्मार्टफोन बघायला मिळेल. तसेच त्यांनी इतर काही प्रोडक्ट्सची देखील माहिती दिली आहे. सध्या कंपनी Realme Pad 5G मॉडेलवर काम करत असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
Realme GT Neo 3 चे स्पेसिफिकेशन्स
Realme GT Neo 3 च्या मागे असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा टेली मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगर सेन्सरची सुरक्षा मिळते.
Realme GT Neo 3 मध्ये अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनी मीडियाटेक डिमेनसिटी 8100 चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी माली जी610 जीपीयूचा वापर करण्यात आला आहे. सोबत 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते.
रियलमी जीटी नियो 3 टेक मंचावर 6.7 इंचाच्या फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या पंच-होल पॅनलला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा आहे. Realme GT Neo 3 चे वेगवेगळ्या बॅटरी आणि चार्जिंग स्पीडचे दोन मॉडेल आहेत. यातील 4,500एमएएचच्या बॅटरीसह 150वॉट फास्ट चार्जिंग मिळते. तर 5,000एमएएच बॅटरी असलेला मॉडेल 80वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.