वनप्लसचं सिंहासन धोक्यात; 16GB रॅम, 5 कॅमेऱ्यांसह Samsung चा धमाकेदार 5G Phone भारतात लाँच

By सिद्धेश जाधव | Published: March 21, 2022 04:59 PM2022-03-21T16:59:05+5:302022-03-21T16:59:48+5:30

Samsung Galaxy A53 5G ची भारतीय किंमत थेट फ्लॅगशिप किलर वनप्लसला टक्कर देत आहे. हा फोन 16GB RAM, 5000mAh ची बॅटरी, 64MP कॅमेरा आणि IP68 रेटिंगसाठी सादर झाला आहे.

16GB RAM Samsung Galaxy A53 5G Phone India Launch Know Price Specifications Sale  | वनप्लसचं सिंहासन धोक्यात; 16GB रॅम, 5 कॅमेऱ्यांसह Samsung चा धमाकेदार 5G Phone भारतात लाँच

वनप्लसचं सिंहासन धोक्यात; 16GB रॅम, 5 कॅमेऱ्यांसह Samsung चा धमाकेदार 5G Phone भारतात लाँच

Next

Samsung नं काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात Galaxy A73, Galaxy A53 आणि Galaxy A33 असे तीन स्मार्टफोन सादर केले होते. यातील सॅमसंग गॅलेक्सी ए53 5जी चं आज भारतात आगमन झालं आहे. हा फोन 16GB RAM, 5000mAh ची बॅटरी, 64MP कॅमेरा आणि IP68 रेटिंगसाठी सादर झाला आहे. Samsung Galaxy A53 5G ची भारतीय किंमत थेट फ्लॅगशिप किलर वनप्लसला टक्कर देत आहे.  

Samsung Galaxy A53 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy A53 5G फोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित वनयुआय 4.1 वर चालतो. यात कंपनीनं ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 5 नॅनोमीटरच्या पावरफुल चिपसेटचा वापर केला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो. सोबत 8GB पर्यंत फिजिकल रॅम देण्यात आला आहे. जो रॅम प्लस फिचरच्या मदतीनं 16GB पर्यंत वाढवता येतो. हा फोन 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. 

सॅमसंग गॅलेक्सी ए53 5जी मध्ये 6.5 इंचाचा एफएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच-होल डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 800निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. सोबत इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा आणि आयपी67 रेटिंग मिळते. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. 

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A53 5G च्या मागे क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळतो. सोबत एक 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, एक 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. 

Samsung Galaxy A53 5G ची किंमत 

सॅमसंग गॅलेक्सी ए53 5जी स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 34,499 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 35,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Light Blue, Awesome Black, White आणि Orange कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. या सॅमसंग फोनची प्री-बुकिंग आजपासून सुरु झाली आहे. 

 

 

Web Title: 16GB RAM Samsung Galaxy A53 5G Phone India Launch Know Price Specifications Sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.