दमदार! 18GB RAM आणि 1TB स्टोरेज असलेला जगातील पहिला स्मार्टफोन लाँच; इतकी आहे किंमत
By सिद्धेश जाधव | Published: November 26, 2021 07:28 PM2021-11-26T19:28:18+5:302021-11-26T19:28:53+5:30
18GB RAM Phone: ZTE Axon 30 Ultra Aerospace Edition फोन 18GB RAM आणि 1TB Storage असलेला जगातील पहिला फोन आहे. हा फोन चीनमध्ये सादर करण्यात आला आहे.
ZTE ने चीनमध्ये आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन ZTE Axon 30 Ultra Aerospace Edition चा लिमिटेड एडिशन मॉडेल लाँच केला आहे. हा फोन 18GB RAM आणि 1TB Storage असलेला जगातील पहिला फोन आहे. कंपनीनं यात 2GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम दिला आहे. त्यामुळे हा एकूण 20GB रॅम असलेला फोन आहे, असं म्हणता येईल. चला जाणून घेऊया ZTE Axon 30 Ultra Aerospace Edition ची किंमत आणि स्पेसिफिकेशन.
ZTE Axon 30 Ultra Aerospace Edition Price
ZTE Axon 30 Ultra Aerospace Edition ची किंमत 6,998 युआन (सुमारे 82,042 रुपये) ठेवण्यात आली आहे. या फोनचा 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेला स्टँडर्ड व्हेरिएंट 4,698 युआन (सुमरे 55,077 रुपये) मध्ये उपलब्ध आहे. जो ब्लॅक, मिंट, व्हाईट आणि लेदर कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
ZTE Axon 30 Ultra Aerospace Edition चे स्पेसिफिकेशन्स
ZTE Axon 30 Ultra Aerospace Edition मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ कर्व्ड अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HDR 10+ आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिवाइसला स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर आता 18GB रॅम आणि 1TB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. वर सांगितल्याप्रमाणे फोनचा रॅम 20GB पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी या डिवाइसमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी सेन्सर, लेन्स आणि एक 8MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स मिळते. अन्य दोन सेन्सरची माहिती उपलब्ध नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी स्मार्टफोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी 4600mAh ची बॅटरी मिळते, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.