१९ वर्षाच्या भारतीय मुलाने AI ब्राउझर तयार केला; सॅम ऑल्टमनने इतक्या कोटींची गुंतवणूक केली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 10:31 AM2023-11-04T10:31:19+5:302023-11-04T10:34:08+5:30
दोन भारतीय मुलांनी मिळून AI ब्राउझर तयार केला आहे. या माध्यमातून वर्च्युअल AI वर्कर बनवता येते.
'एआय' तंत्रनामुळे इंटरनेट जगतात क्रांती होणार आहे. एआयची सध्या सगभरात चर्चा सुरू आहे, यामुळेच Open AI चे CEO सॅम ऑल्टमन यांना अनेक लोक ओळखतात. त्यांनी आता काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. नुकतेच ते दोन भारतीय मुलांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास राजी झाले आहेत. १९ वर्षीय आर्यन शर्माने सॅम ऑल्टमनला Induced AI कंपनीत गुंतवणूक करण्यास राजी केले आहे. आर्यन शर्माने सॅम ऑल्टमनकडून गुंतवणूक मिळवण्यापर्यंतची त्याची सुरुवात आणि प्रवास सांगितला आहे.
अंबानींनी केली दिवाळीची मोठी खरेदी! वर्ल्ड फेमस ब्युटी बिझनेस विकत घेतला, Sephora चे प्रोडक्ट मिळणार
सुरुवातीच्या काळात तो कसा अनेकांना ईमेल करत असे. शर्मा यांनी सांगितले की, वयाच्या १४ व्या वर्षापासून तो अनेक महत्त्वाच्या लोकांना त्यांच्या मार्गदर्शनासाठी मेल करायचा. सॅम ऑल्टमनला भेटायला काय लागलं? त्याने सांगितले की अनेकांनी त्याला ईमेल पाठवण्यासही नकार दिला. आर्यनने सांगितले की, तो आणि Induced AI सह-संस्थापक आयुष पाठक यांनी पैसे गोळा केले आणि सॅम ऑल्टमनला भेटण्यासाठी सॅन फ्रान्सिस्कोला गेले. तिथे तो त्याच्या मित्रांसोबत राहिला आणि एका कार्यक्रमात गेला तिथे ऑल्टमन उपस्थित राहणार होते.
बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर आर्यनला सॅम ऑल्टमन यांना भेटण्याची संधी मिळाली. त्याने सांगितले की जेव्हा तो ऑल्टमनला भेटला तेव्हा त्याने स्वतःला सचिव बनवण्याची विनंती केली.
त्या भेटीनंतर तो सॅम ऑल्टमन यांच्या संपर्कात होता. निधी उभारणीदरम्यान आयुष आणि आर्यन यांनी ऑल्टमन यांच्याशी संपर्क साधला, तिथे त्यांना २३ लाख डॉलर्स (सुमारे १९ कोटी रुपये) ची गुंतवणूक मिळाली. ही गुंतवणूक Indused AI मध्ये सॅम ऑल्टमन यांनीच केली नाही तर इतर गुंतवणूकदारांनीही केली आहे.
Induced AI हे AI ब्राउझर प्लॅटफॉर्म आहे, हे काम पूर्ण करण्यासाठी AI एजंट्स वापरते. म्हणजेच तुम्ही तुमचे काम AI एजंट्सकडे सोपवू शकता. कंपनीचा दावा आहे की एआय वर्कर तुमच्या ब्राउझरची कामे स्वयंचलित करतील.
तुम्ही एआय एजंटना तुमचे काम समजावून सांगा आणि ते त्याद्वारे ब्राउझ करतील आणि तुम्हाला रिझल्ट देतील. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी एआय वर्कर तयार करू शकता. आपण आपला मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी व्हिडीओ देखील अपलोड करू शकता. ते वापरण्याचा एक फायदा असा आहे की, या प्लॅटफॉर्मवर काम समजावून सांगून तुम्ही त्या वेळेत काहीतरी वेगळे करू शकता. तुमचे कार्य पूर्ण झाल्यावर, तुम्हाला एक ईमेल सूचना प्राप्त होईल. यावर तुम्हाला अँटी बॉट डिटेक्शन, कॅप्चा हाताळणी, सुरक्षित प्रवेश यासह इतर अनेक फीचर्स मिळतील.