फक्त 3 रुपयांत 1GB डेटा, 56 दिवस चालणार Recharge; याच्या समोर जिओ-एअरटेलही फेल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 03:40 PM2022-06-12T15:40:48+5:302022-06-12T15:41:46+5:30
आज आम्ही आपल्याला एका अशा प्लॅनसंदर्भात माहिती देत आहोत, जो आपल्याला केवळ 3 रुपयांत 1 जीबी डेटाची देतो...
Reliance Jio, Vodafone-Idea आणि Airtel सारख्या कंपन्यांकडे विविध प्रकारचे प्रीपेड प्लॅन्स आहेत. मात्र, असे असले तरी किमतीच्या बाबतीत, या कंपन्या सरकारी कंपनी BSNL सोबत स्पर्धा करू शकत नाही. आज आम्ही आपल्याला BSNL च्या एका अशा प्लॅनसंदर्भात माहिती देत आहोत, जो आपल्याला केवळ 3 रुपयांत 1 जीबी डेटाची देतो. तर जाणून घेऊयात या प्लॅनसंदर्भात.
BSNL चा 347 रुपयांचा प्लॅन -
बीएसएनएलचा हा प्लॅन इतर कंपन्यांना जबरदस्त टक्कर देतो. या प्लॅनमध्ये आपल्याला 56 दिवसांची वैधता दिली जाते आणि रोज २ जीबी हायस्पीड डेटा दिला जातो. म्हणजेच 56 दिवसांसाठी एकूण 112 GB डेटा दिला जातो. अशा अपद्धतीने जर आपण 1 GB डेटाची किंमत काढली, तर ती सुमारे 3 रुपये (347÷112) एवढी होते. डेटा व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये फ्री अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS आणि गेमिंग सेवा देखील दिली जाते.
इतर कंपन्यांच्या ऑफर -
इतर कंपन्यांशी तुलना केल्यास, रिलायन्स जिओ आपल्याला 479 रुपयांमध्ये 56 दिवसांची वैधता ऑफर करते. या जिओच्या या प्लॅनमध्ये रोज 1.5 GB डेटा मिळतो. म्हणजेच एकूण 84 GB डेटा मिळतो. हा डेटा BSNL च्या प्लॅनपेक्षा 28 GB कमी आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग, एसएमएस आणि जिओ अॅप्स सबस्क्रिप्शन यांसारख्या सुविधाही देण्यात येतात.
Airtel बद्दल बोलायचे झाल्यास, या किंमतीच्या रेंजमध्ये 359 रुपयांचा प्लॅन आहे, यात 28 दिवसांसाठी रोज 2 GB डेटा मिळतो. म्हणजेच एकूण 56 GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबतच 100 एसएमएस आणि प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशन फ्री ट्रायल सारखे फीचर्स देखील दिले जात आहेत.