MG Motors च्या ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन लॉन्च; पाहा, किंमत आणि डिटेल्स
By देवेश फडके | Published: February 8, 2021 02:15 PM2021-02-08T14:15:30+5:302021-02-08T14:17:18+5:30
MG Motors कंपनीच्या ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन अपग्रेडेट व्हर्जन ०८ फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले.
नवी दिल्ली : अगदी कमी कालावधीत भारतीय बाजारपेठेत जम बसवलेल्या MG Motors कंपनीने आपल्या ZS EV या इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन अपग्रेडेट व्हर्जन ०८ फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले. (2021 MG ZS EV launch in India)
एमजी मोटर्सच्या ZS EV इलेक्ट्रिक कारची स्पर्धा ह्युंदाई कोना, टाटा नेक्सॉन इव्ही, टाटा टियागो इव्ही या गाड्यांशी असणार आहे. एकदा चार्ज केल्यावर ZS EV इलेक्ट्रिक कार ३४० कि.मी.चे अंतर जाऊ शकते. मात्र, नवीन व्हर्जनमध्ये क्षमता वाढवण्यात आल्यामुळे आता ही इलेक्ट्रिक कार ४१९ कि.मी. अंतर कापू शकते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. ZS EV इलेक्ट्रिक कारला भारतीय बाजारपेठेत उत्तम प्रतिसाद मिळाल्याने या गाडीचे अपग्रेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
इलेक्ट्रीक वाहन घेण्याचे फायदेच अधिक; तोटे फक्त २...जाणून घ्या...
MG ZS EV इलेक्ट्रिक कारची किंमत
ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जनची भारतीय बाजारपेठेतील एक्स शो-रुम किंमत २०.९९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. संपूर्ण भारतातील ३१ शहरांमध्ये ही गाडी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन Excite आणि Exclusive या दोन पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध करण्यात आले असून, याची भारतीय बाजारपेठेतील एक्स शो-रुम किंमत अनुक्रमे २० लाख ९९ हजार ८०० रुपये आणि २४ लाख १८ हजार रुपये आहे. तसेच या गाडीच्या बॅटरीला आठ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.
MG Moters कडून नवी ‘हेक्टर २०२१’ लाँच; इंग्लिश नाही तर हिंग्लिश कमांड्सही देता येणार
MG ZS EV इलेक्ट्रिक कारचे फिचर्स
MG ZS EV इलेक्ट्रिक कारच्या नवीन व्हर्जनमध्ये iSmart EV 2.0 टेक्नोलॉजी, पॅनरॉमिक सनरुफ, टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम विथ अँड्राइड-अॅपल कारप्ले कनेक्टेड, हिटेड ओआरव्हिएम यांसारखे अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. यासह सुरक्षेसाठी या गाडीत सहा एयरबॅग्स, HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत. ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज केली जाऊ शकते. तसेच अवघ्या ५० मिनिटांत ही कार चार्ज होऊ शकेल, असा दावा केला जात आहे.