अबब! 21000mAh ची जम्बो बॅटरी; 3 महिने चार्जिंगची गरज नसलेला जगातील पहिला फोन लाँच
By सिद्धेश जाधव | Published: June 2, 2022 05:56 PM2022-06-02T17:56:32+5:302022-06-02T17:56:42+5:30
चीनी ब्रँड Qukitel ने 21,000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे.
हेव्ही स्मार्टफोन युजर्सना सध्या स्मार्टफोनमधील मिळणारी 5,000mAh ची बॅटरी कमी पडते. त्यात हाय रिफ्रेश रेट, नवीन चिपसेट यामुळे स्मार्टफोन्स देखील पावर हंग्री झाले आहेत. तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांना तर 7000mAh बॅटरी असलेले स्मार्टफोन देखील इतका दिलासा देत नाहीत. यावर उपाय म्हणून चीनी ब्रँड Qukitel नं 21,000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे.
एवढी मोठी बॅटरी असलेला जगातील पहिला फोन
Qukitel WP19 जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात 21,000mAh बॅटरी मिळत आहे. हा स्मार्टफोन 36 तास व्हिडीओ प्लेबॅक, 123 तास म्यूजिक प्लेबॅक, 122 तास कॉल आणि 2252 तास (94 दिवस) स्टँडबाय टाइम देऊ शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच रिवर्स वायर्ड चार्जिंग फीचरमुळे या मोबाईलचा वापर पावर बँक प्रमाणे करता येईल. 27W फास्ट चार्जिंगमुळे हा डिवाइस फक्त 4 तासांत फुल चार्ज होतो.
Qukitel WP19 चे स्पेसिफिकेशन्स
Qukitel WP19 स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा FHD+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये MediaTek Helio G95 4G प्रोसेसर मिळतो. सोबत 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
Qukitel WP19 स्मार्टफोन IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह बाजारात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात NFC, Bluetooth 5.0, Wi-Fi सारखे फीचर्स मिळतात. हा डिवाइस साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, MIL-STD-810G रेटिंगला देखील सपोर्ट करतो. फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 20MP चा नाईट व्हिजन सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
किंमत
चीनमध्ये या फोनची किंमत 694 युरो (जवळपास 57,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन भारतात आयत करता येईल परंतु थेट विक्रीबाबत कोणीतही माहिती कंपनीनं दिली नाही. कंपनीनं आपल्या वेबसाईटवर हा हँडसेट मोफत देण्यासाठी ‘गिव्ह अवे’ चं आयोजन केलं आहे.