मोबाईलमधून तातडीनं डिलीट करा 'ही' 23 अ‍ॅप्स; अन्यथा बँक खातं होईल रिकामं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:06 PM2020-08-26T12:06:58+5:302020-08-26T12:08:01+5:30

ग्राहकांच्या नकळत त्याचं बँक खातं हळूहळू रिकामी करणाऱ्या अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध

23 Dangerous Android Apps With Hidden Spam Subscriptions Delete Them Now | मोबाईलमधून तातडीनं डिलीट करा 'ही' 23 अ‍ॅप्स; अन्यथा बँक खातं होईल रिकामं

मोबाईलमधून तातडीनं डिलीट करा 'ही' 23 अ‍ॅप्स; अन्यथा बँक खातं होईल रिकामं

googlenewsNext

नवी दिल्ली: मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अँड्रॉईड वापरकर्त्यांना तातडीनं २३ अ‍ॅप्स डिलीट करण्याची सूचना देण्यात आली आहे. ही अ‍ॅप्स हळूहळू ग्राहकांच्या खात्यातील पैसे काढतात. विशेष म्हणजे ग्राहकांच्या नकळत ही अ‍ॅप्स काम करत असतात आणि बँक खाती रिकामी करतात. सायबर सिक्युरिटी आणि सॉफ्टवेअर फर्म Sophos च्या संशोधकांनी अशा अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध केली आहे.

Sophos च्या संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या यादीतील सर्व अ‍ॅप्स फ्लेसवेयर आहेत. या सगळ्या अ‍ॅप्सनी गुगलच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. फ्लेसवेयर एका प्रकारचं मालवेयर अ‍ॅप्लिकेशन असतं. त्याचं सबस्क्रिप्शन शुल्क लपवलं जातं. अ‍ॅप्स मोबाईलमधून डिलीट केल्यानंतर त्याचं सबस्क्रिप्शन कसं रद्द करायचं, याची माहिती अनेकांना नसते. त्याचाच गैरफायदा अशा अ‍ॅप्सकडून घेतला जातो.

फ्लेसवेयर प्रकारात मोडली जाणारी अ‍ॅप्स विविध मार्गांनी ग्राहकांची फसवणूक करतात. स्पॅम सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून ही अ‍ॅप्स सुरुवातीला ग्राहकांना फ्री ट्रायल देतात. मात्र सबस्क्रिप्शन नेमकं कधी संपणार आणि त्यानंतर किती शुल्क आकारलं जाणार, याची माहिती ग्राहकांना दिली जात नाही. याशिवाय अटी आणि शर्ती अशा प्रकारे दाखवल्या जातात की त्या वाचणं अशक्य असतं. तुम्ही एकदा या अ‍ॅपमध्ये साईन-अप केल्यावर कोणत्याही परवानगीशिवाय अनेक अ‍ॅप्स सबस्क्राईब केली जातात. त्यामुळे कित्येकदा ग्राहकांच्या नकळत शेकडो अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शन सुरू होतं.

तातडीनं डिलीट करा ही अ‍ॅप्स-
com.photoconverter.fileconverter.jpegconverter
com.recoverydeleted.recoveryphoto.photobackup
com.screenrecorder.gamerecorder.screenrecording
com.photogridmixer.instagrid
com.compressvideo.videoextractor
com.smartsearch.imagessearch
com.emmcs.wallpapper
com.wallpaper.work.application
com.gametris.wallpaper.application
com.tell.shortvideocom.csxykk.fontmoji
com.video.magiciancom.el2020xstar.xstar
com.dev.palmistryastrology
com.dev.furturescopecom.fortunemirror
com.itools.prankcallfreelitecom.isocial.fakechat
com.old.mecom.myreplica.celebritylikeme.pro
com.nineteen.pokeradar
com.pokemongo.ivgocalculatorcom.hy.gscanner
 

Web Title: 23 Dangerous Android Apps With Hidden Spam Subscriptions Delete Them Now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.