फक्त 1 तासांत विकले गेले 2.7 लाखांपेक्षा जास्त फोन; Redmi च्या 'या' स्मार्टफोनचा जलवा 

By सिद्धेश जाधव | Published: June 1, 2022 07:17 PM2022-06-01T19:17:16+5:302022-06-01T19:21:19+5:30

Redmi नं वीस हजारांच्या आत सादर केलेल्या स्मार्टफोनचे फक्त एका तासात 2,70,000 पेक्षा जास्त यूनिट विकले गेले.  

270000 Units Of Redmi Note 11t Pro Got Sold In Just One Hour  | फक्त 1 तासांत विकले गेले 2.7 लाखांपेक्षा जास्त फोन; Redmi च्या 'या' स्मार्टफोनचा जलवा 

फक्त 1 तासांत विकले गेले 2.7 लाखांपेक्षा जास्त फोन; Redmi च्या 'या' स्मार्टफोनचा जलवा 

googlenewsNext

Redmi नं पुन्हा एकदा नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. पहिल्याच सेलमध्ये Redmi Note 11T Pro स्मार्टफोनचे 2,70,000 युनिट्स फक्त एका तासात विकले गेले आहेत. हा धमाकेदार प्रतिसाद चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेलमध्ये मिळाला आहे. यातून कंपनीची नेमकी किती कमाई झाली याची माहिती मात्र मिळाली नाही. लवकरच हा हँडसेट भारतात देखील येऊ शकतो, तेव्हा देखील असा प्रतिसाद मिळेल की नाही ते पाहावं लागेल.  

Redmi Note 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 11T Pro फोनमध्ये 67 वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह 5080mAh ची बॅटरी आहे. प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेकचा डिमेन्सिटी 8100 चिपसेट मिळतो. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.    

फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोन डॉल्बी व्हिजन आणि डीसी डिमिंग सपोर्टसह बाजारात आला आहे. बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा ISOCELL GW1 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.  

Redmi Note 11T Pro ची किंमत  

Redmi Note 11T Pro चा 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट 1699 युआन (जवळपास 19,800 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. तर 8 जीबी रॅम व 128 जीबी मॉडेलची किंमत 1,999 युआन (जवळपास 23,300 रुपये) आणि 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट 2099 युआन (जवळपास 24,500 रुपये) मध्ये विकत घेता येईल. 

Web Title: 270000 Units Of Redmi Note 11t Pro Got Sold In Just One Hour 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.