दररोज 2GB डेटा अन् 365 डिवसांची व्हॅलिडिटी; BSNL च्या प्लॅनसमोर Jio-Airtel विसरुन जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 06:54 PM2024-07-15T18:54:12+5:302024-07-15T18:54:41+5:30

Jio आणि Airtel ने आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे अनेक ग्राहक BSNL मध्ये पोर्ट करत आहेत.

2GB data per day and validity of 365 days; BSNL's plan is better than Jio-Airtel | दररोज 2GB डेटा अन् 365 डिवसांची व्हॅलिडिटी; BSNL च्या प्लॅनसमोर Jio-Airtel विसरुन जाल

दररोज 2GB डेटा अन् 365 डिवसांची व्हॅलिडिटी; BSNL च्या प्लॅनसमोर Jio-Airtel विसरुन जाल

BSNL 395 Days Plan : Jio, Airtel आणि Vodafone Idea(vi) सारक्या खासगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत. याचा फायदा घेत सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL लवकरच देशभरात 4G सेवा सुरू करणार असून, त्यांनी स्वस्त प्लॅन्सदेखील लॉन्च केले आहेत. खासगी कंपन्यांच्या वाढीव रिचार्जमुळे अनेक ग्राहक BSNL मध्ये पोर्ट करत आहेत. 

देशभरात 4G सेवा सुरू झाल्यानंतर अधिक युजर्स बीएसएनएलमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, बीएसएनएलच्या एका प्लॅनची सध्या ​​सर्वाधिक चर्चा होत आहे. हा प्लॅन 395 दिवसांचा आहे. यामध्ये मिळणारे बेनिफिट्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या प्लॅनची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हा इतर कंपन्यांच्या प्लॅन्सच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. 

BSNL चा 395 दिवसांचा प्लॅन
बीएसएनएलचा 395 दिवसांचा प्लॅन 2,399 रुपयांना मिळतो. यामध्ये यूजरला दररोज 2 gb डेटा मिळ आणि देशभरातील सर्व नेटवर्क्सवर अमर्यादित व्हॉईस कॉलचा लाभ मिळेल. याशिवाय 100 एसएमएसची सेवाही उपलब्ध आहे. याशिवाय, झिंग म्युझिक, बीएसएनएल ट्यून्स, हार्डी गेम्स, चॅलेंजर अरेना गेम्स आणि गेमऑन ॲस्ट्रोटेल सारख्या सेवादेखील उपलब्ध असतील.

jio-airtel चे प्लॅन
Jio आणि Airtel कडे असाच प्रीपेड प्लॅन आहेत, परंतु त्याची किंमत BSNLपेक्षा खूप जास्त आहेत. या दोन्ही कंपन्या 3599 रुपयांमध्ये 365 दिवसांचा प्लॅन ऑफर करत आहेत. या प्लॅनमध्ये एअरटेल दररोज 2 जीबी डेटा देत आहे, तर जिओ दररोज 2.5 जीबी डेटा देत आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही कंपन्या यूजर्सना 5G सेवा देत आहेत. याबाबतीत BSNL सध्या खूप मागे आहे. पण, लवकरच बीएसएनएल अपडेट होणार आहे.

Web Title: 2GB data per day and validity of 365 days; BSNL's plan is better than Jio-Airtel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.