13GB रॅम आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह OPPO F21 Pro 4G लाँच! इतकं आहे फोनचं बजेट 

By सिद्धेश जाधव | Published: April 11, 2022 01:06 PM2022-04-11T13:06:00+5:302022-04-11T13:06:09+5:30

13GB RAM, 33W फास्ट चार्जिंग, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4,500mAh बॅटरीसह OPPO F21 Pro 4G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.

32mp selfie camera featured oppo f21 pro 4g launched price specs sale offer | 13GB रॅम आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह OPPO F21 Pro 4G लाँच! इतकं आहे फोनचं बजेट 

13GB रॅम आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह OPPO F21 Pro 4G लाँच! इतकं आहे फोनचं बजेट 

googlenewsNext

OPPO F21 Pro सीरिजमध्ये उद्या भारतात OPPO F21 Pro 4G आणि OPPO F21 Pro 5G असे दोन स्मार्टफोन सादर केले जाणार आहेत. परंतु भारतीय लाँचपूर्वीच कंपनीनं शेजारच्या देशात यातील 4G स्मार्टफोन सादर केला आहे. या लाँचमुळे फोनच्या स्पेक्सची आणि किंमतची माहिती मिळाली आहे. बांग्लादेशात 13GB RAM, 33W फास्ट चार्जिंग, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4,500mAh बॅटरीसह OPPO F21 Pro 4G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.  

OPPO F21 Pro 4G चे स्पेसिफिकेशन्स 

बांग्लादेशात OPPO F21 Pro 4G स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह लाँच झाला आहे. परंतु यातील व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 5जीबी अतिरिक्त रॅम मिळवता येतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सोबत ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू मिळतो. 

ओप्पो एफ21 प्रो 4जी मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले कॉर्निग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह 600नीट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचाच मॅक्रो सेन्सर मिळतो. फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.  

OPPO F21 Pro 4G मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंटची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच या ड्युअल सिम फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी मिळते. जी 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीनं चार्ज करता येते.  

OPPO F21 Pro 4G ची किंमत 

बांग्लादेशात ओप्पो एफ21 प्रो 4जी स्मार्टफोनचा एकच 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेल लाँच झाला आहे. ज्याची किंमत 24,500 भारतीय रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. त्यामुळे उद्या भारतात देखील याच किंमतीत हा फोन सादर केला जाऊ शकतो.  

Web Title: 32mp selfie camera featured oppo f21 pro 4g launched price specs sale offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.