50MP च्या दोन कॅमेऱ्यांसह भन्नाट Motorola Moto Edge 30 लाँच, 32MP चा शानदार सेल्फी कॅमेरा
By सिद्धेश जाधव | Published: April 28, 2022 09:03 AM2022-04-28T09:03:59+5:302022-04-28T09:04:29+5:30
Moto Edge 30 या डिवाइसमध्ये 50MP camera, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 778G+ चिपसेट आणि 33W फास्ट चार्जिंग मिळते.
Motorola नं आपल्या ‘एज’ सीरिजमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर Snapdragon 8 Gen 1 चिपसेट असलेला Moto Edge 30 Pro लाँच केला आहे. या प्रोसेसरसह येणारा हा जगातील पहिला हँडसेट होता. आता या सीरिजमध्ये कंपनीनं Moto Edge 30 स्मार्टफोन लाँच केला आहे. या डिवाइसमध्ये 50MP camera, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 778G+ चिपसेट आणि 33W फास्ट चार्जिंग मिळते.
Moto Edge 30 चे स्पेसिफिकेशन्स
मोटोरोला एज 30 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल डिजाईनसह यात 144हर्टज रिफ्रेश रेट मिळतो. हा अँड्रॉइड 12 डिवाइस माययूएक्सवर चालतो. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी+ चिपसेटची टाकत डिवाइसमध्ये देण्यात आली आहे, जो एक 5G चिपसेट आहे.
फोटोग्राफीसाठी Moto Edge 30 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची 118डिग्री अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मोटोरोला मोटो एज 30 मध्ये मिळतो.
फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सरसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. हा फोन आयपी52 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह येतो. पावर बॅकअपसाठी मोटोरोला मोटो एज 30 स्मार्टफोनमध्ये 4,020एमएएचची बॅटरी 33वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
Moto Edge 30 ची किंमत
सध्या हा फोन युरोपियन बाजारात आला आहे. तिथे Moto Edge 30 नं 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या एकमेव व्हेरिएंटसह एंट्री घेतली आहे. कंपनीनं या मॉडेलची किंमत 450 युरो ठेवली आहे. ही किंमत 36,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन Aurora Green, Meteor Grey आणि Supermoon Silver कलरमध्ये विकत घेता येईल. लवकरच Moto Edge 30 भारतात देखील दाखल होऊ शकतो.