44MPच्या सॉलिड सेल्फी कॅमेऱ्यासह Vivoचा 5G Phone करणार एंट्री; भारतीय लाँचसाठी उरले काही दिवस

By सिद्धेश जाधव | Published: February 15, 2022 12:30 PM2022-02-15T12:30:15+5:302022-02-15T12:30:42+5:30

44MP Selfie Camera Phone: Vivo V23e 5G स्मार्टफोन जागतिक बाजारात 44MP सेल्फी कॅमेरा, 44W फास्ट चार्जिंग, 8GB RAM आणि मीडियाटेक प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.

44MP Selfie Camera Phone Vivo V23e 5G To Launch In India On 21 February   | 44MPच्या सॉलिड सेल्फी कॅमेऱ्यासह Vivoचा 5G Phone करणार एंट्री; भारतीय लाँचसाठी उरले काही दिवस

44MPच्या सॉलिड सेल्फी कॅमेऱ्यासह Vivoचा 5G Phone करणार एंट्री; भारतीय लाँचसाठी उरले काही दिवस

Next

Vivo नं काही दिवसांपूर्वी Vivo V23e 5G नावाचा स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर केला होता. यातील 44MP सेल्फी कॅमेरा याची खासियत म्हणता येईल. आता हा स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येत आहे. Vivo V23 आणि Vivo V23 Pro नंतर या सीरिजमध्ये Vivo V23e 5G पदार्पण करणार आहे. समोर आलेल्या लिक्सनुसार येत्या 21 फेब्रुवारीला हा फोन भारतात लाँच होईल. 

Vivo V23e 5G चे स्पेसिफिकेशन्स   

Vivo V23e 5G मध्ये पॉवर पॅक कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याची सुरुवात 44 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यापासून होते. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. 

Vivo V23e 5G मध्ये 6.44 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेक डिमेन्सिटी 810 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. हा डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. या ड्युअल सिम फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पॉवर बॅकअपसाठी 4,050एमएएचची बॅटरीला 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.    

हे देखील वाचा:

Web Title: 44MP Selfie Camera Phone Vivo V23e 5G To Launch In India On 21 February  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.