पाण्यात देखील खराब न होणारा शानदार स्मार्टफोन लाँच; परवडणाऱ्या किंमतीत Oppo Reno 7A
By सिद्धेश जाधव | Published: June 16, 2022 03:18 PM2022-06-16T15:18:12+5:302022-06-16T15:18:24+5:30
Oppo Reno 7A मध्ये 48MP कॅमेरा, 6GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Oppo ची Reno 8 सीरिज बाजारात आली आहे, परंतु कंपनीनं आपल्या जुन्या Reno 7 सीरिजमध्ये Oppo Reno 7A स्मार्टफोनची भर टाकली आहे. कंपनीनं हा फोन सध्या जपानमध्ये सादर केला आहे. ज्यात 48MP कॅमेरा, 6GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया हा शानदार स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
Oppo Reno 7A ची किंमत
Oppo Reno 7A चा एकच व्हेरिएंट उगवत्या सूर्याच्या देशात सादर करण्यात आला आहे. हा मॉडेलमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. जापानमध्ये या हँडसेटची किंमत 44,800 येन (सुमारे 26 हजार रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन स्टारी ब्लॅक आणि ड्रीम ब्लू कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.
Oppo Reno 7A चे स्पेसिफिकेशन
फोनमध्ये 6.4 इंचाचा AMOLED डिस्प्ले पंच-होल डिजाईनसह देण्यात आला आहे. हा फुल एचडी+ रेजॉलूशनसह 90Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅंप्लिंग रेट आणि 89.4% स्क्रीन टू बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. यातील IP68 रेटिंग याचे पाणी आणि धुळीपासून संरक्षण करते. ओप्पोच्या या फोनचे वजन 175 ग्राम आहे.
हा फोन 6 जीबी LPDDR4x रॅम आणि 128 जीबी UFS 2.2 स्टोरेजसह बाजारात आला आहे. फोनमध्ये कंपनी मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट आहे. फोनला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. हा अँड्रॉइड 11 बेस्ड ColorOS 12 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी Oppo Reno 7A च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 48 मेगापिक्सल आहे. सोबत 2 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हि फीचर्स असलेला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. या फोनमधील 500mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.