नवीन फोन येण्याआधी जुन्या OnePlus 9 5G च्या किंमतीत पुन्हा मोठी कपात, जाणून घ्या नवी Price
By सिद्धेश जाधव | Published: June 10, 2022 02:55 PM2022-06-10T14:55:58+5:302022-06-10T14:56:09+5:30
OnePlus 9 5G च्या किंमतीती पुन्हा एकदा मोठी कपात करण्यात आली आहे.
OnePlus लवकरच बाजारात आपला आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 10 लाँच करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. हा हँडसेट जुन्या OnePlus 9 5G ची जागा घेईल. त्यामुळेच कदाचित पुन्हा एकदा वनप्लस 9 5जीच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. याआधी मार्चमध्ये वनप्लस 9 ची किंमत 5,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
नवीन किंमत
OnePlus 9 5G स्मार्टफोनचा 8GB RAM व 128GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात 44,999 रुपयांमध्ये विकला जात होता. आता 7000 रुपयांच्या कपातीनंतर हा मॉडेल 37,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर 12GB RAM व 256GB स्टोरेज व्हेरिएंट 42,999 रुपयांमध्ये विकला जात आहे, जो 49,999 रुपयांमध्ये मिळत होता.
OnePlus 9 5G चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 9 5G मध्ये कंपनीनं 6.55 इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 3D गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह येतो. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे. डिवाइस Andriod 11 आधारित वनप्लस ऑक्सीजन ओएस 11 वर चालतो. यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे.
OnePlus 9 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या स्मार्टफोनचा मेन कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय यात 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेलची मोनोक्रोम लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी यात 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.