अरे बापरे! हॅकर्सचा 'महाभयंकर' नवा प्लॅन; ५ कोटी युजर्ससाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:18 IST2025-02-11T15:17:45+5:302025-02-11T15:18:14+5:30

भारत सरकारने फेब्रुवारी २०२५ मध्ये अँड्रॉइड युजर्ससाठी एक नवीन सिक्योरिटी अलर्ट जारी केला आहे.

50 million smartphone users in danger indian govt warns hacking risk | अरे बापरे! हॅकर्सचा 'महाभयंकर' नवा प्लॅन; ५ कोटी युजर्ससाठी धोक्याची घंटा

अरे बापरे! हॅकर्सचा 'महाभयंकर' नवा प्लॅन; ५ कोटी युजर्ससाठी धोक्याची घंटा

भारत सरकारने फेब्रुवारी २०२५ मध्ये अँड्रॉइड युजर्ससाठी एक नवीन सिक्योरिटी अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या फोनच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटू शकते. हा धोक्याचा इशारा इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने जारी केला आहे. रिपोर्टनुसार, सुरक्षा त्रुटीमुळे, हॅकर्स सहजपणे संवेदनशील माहिती चोरू शकतात आणि फोनवर मनमानी कोड एक्सीक्यूट करू शकतात.

कोणत्या अँड्रॉइड व्हर्जनवर होणार परिणाम?

ही नवीन सिक्योरिटी रिस्क Android 12, 12L, 13, 14 आणि नवीनतम 15 व्हर्जनवर परिणाम करू शकते. भारतात या व्हर्जनवर चालणाऱ्या फोनची संख्या ५ कोटींपेक्षा जास्त असू शकते. अशा परिस्थितीत, हा धोका खूप गंभीर मानला जात आहे आणि स्मार्टफोन ब्रँड्सनी तो गांभीर्याने घेणं आवश्यक आहे, जेणेकरून युजर्सना संभाव्य सायबर हल्ल्यांपासून वाचवता येईल.

सुरक्षेतील त्रुटी

CERT-In च्या मते, ही सुरक्षा त्रुटी अनेक महत्त्वाच्या कंपोनेंट्समध्ये आढळून आली आहे.

• अँड्रॉइडची फ्रेमवर्क आणि सिस्टम
• ARM कंपोनेंट्स
•  Imagination Technologies कंपोनेंट्स
• MediaTek चिप्स
• Qualcomm चिप्स आणि त्याचे क्लोज्ड-सोर्स कंपोनेंट्स

या हार्डवेअरशी संबंधित समस्यांमुळे, जवळजवळ सर्व अँड्रॉइड स्मार्टफोन ब्रँड आणि त्यांचे युजर्स सायबर हल्ल्याचे बळी ठरू शकतात.

तुमचा फोन कसा सुरक्षित ठेवायचा?

दिलासा देणारी गोष्ट म्हणजे गुगलने आधीच एक अपडेट जारी केला आहे. सर्व अँड्रॉइड युजर्सना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी त्यांचे फोन लवकरात लवकर अपडेट करावेत, जेणेकरून ते या धोक्यापासून वाचू शकतील.

तुमचा अँड्रॉइड फोन सुरक्षित ठेवण्यासाठी हे करा फॉलो

- फोनची सेटिंग्ज उघडा.

- सिस्टम अपडेट्स ऑप्शनवर जा.

- लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट्स डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.
 

Web Title: 50 million smartphone users in danger indian govt warns hacking risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.