इतक्या स्वस्तात आला Realme V23 स्मार्टफोन; 12GB RAM, 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी
By सिद्धेश जाधव | Published: April 14, 2022 04:44 PM2022-04-14T16:44:24+5:302022-04-14T16:45:08+5:30
Realme V23 स्मार्टफोनमध्ये 12GB RAM, 48MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग मिळते.
Realme ने चीनमध्ये आपल्या V सीरीजचा विस्तार केला आहे. कंपनीनं आपला नवीन Realme V23 स्मार्टफोन Dimensity 810 प्रोसेसर, 12GB RAM, 48MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग, अशा फीचर्ससह सादर केला आहे. हा एक स्वस्त 5G फोन आहे जो बजेट सेगमेंटमध्ये रेडमी, मोटोरोला, आयकू आणि विवोला चांगलीच टक्कर देऊ शकतो.
Realme V23 चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी वी23 स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक आयपीएस एलसीडी पॅनल आहे. यात MediaTek Dimensity 810 SoC ची प्रोसेजिंग पावर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 12GB पर्यंत रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह एक फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.
Realme V23 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह मिळते.
Realme V23 ची किंमत
Realme V23 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. यातील 8GB रॅम व 256GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 1699 युआन (सुमारे 20,300 रुपये) आहे. तर 12GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,899 युआन (सुमारे 22,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन ग्लास मॅजिक आणि ग्रेवल ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. चीनच्या बाहेर या डिवाइसचं रीब्रॅंडिंग केलं जाऊ शकतं.