स्वस्त आणि मस्त 5G फोननं घेतला वनप्लसशी पंगा; एक-दोन नव्हे तर 13 5G बँड्ससह Moto G82 5G ची एंट्री
By सिद्धेश जाधव | Published: June 7, 2022 01:48 PM2022-06-07T13:48:55+5:302022-06-07T13:49:02+5:30
Moto G82 5G स्मार्टफोन Snapdragon 695 5G प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे.
Motorola सध्या भारतात मोठयाप्रमाणावर सक्रिय झाली आहे. कंपनीनं गेल्या आठवड्यात बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर केला होता. तर आता मिडरेंजमध्ये Moto G82 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन Snapdragon 695 5G प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट, pOLED डिस्प्ले, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5000mAh च्या बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे.
Moto G82 5G चे स्पेसिफिकेशन्स
Moto G82 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU देण्यात आला आहे. सोबत 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते, जी मेमरी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. Motorola चा हा फोन Android 12 OS वर चालेल.
Moto G82 ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टमसह येतो, ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर OIS सह देण्यात आला आहे. सोबत 8MP चा अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देखील आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, 13 5G बँड आणि IP52 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स रेटिंग मिळते. Moto G82 मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 30W वायर्ड फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करते.
Motorola Moto G82 5G ची किंमत
Moto G82 5G चा 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेल 19,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. तर 8GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,499 रुपये आहे. हा फोन ग्रे आणि व्हाइट ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. हा फोन फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल आणि अन्य प्रमुख रिटेल स्टोरवरून विकत घेता येईल.