मोटोरोलाचा घणाघाती वार! रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Moto G42 येणार मैदानात
By सिद्धेश जाधव | Published: June 28, 2022 04:01 PM2022-06-28T16:01:24+5:302022-06-28T16:01:48+5:30
50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी असलेला Moto G42 स्मार्टफोन भारतात येत आहे.
Moto G42 स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला होता. जागतिक बाजारातील लाँचनंतर भारतीय ग्राहकांना या हँडसेटचे वेध लागले होते. आता कंपनीनं मोटोरोला इंडियानं या स्मार्टफोनच्या लाँचची माहिती दिली आहे. येत्या 4 जुलैला Moto G42 स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात येईल. या हँडसेटची विक्री शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. यासाठी एक प्रोडक्ट पेज देखील लाईव्ह करण्यात आलं आहे.
Moto G42 चे स्पेसिफिकेशन्स
Moto G42 स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा Full HD+ g-OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 अस्पेक्ट रेश्यो आणि 60Hz रिफ्रेश रेट आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 20W TurboCharge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. बेसिक कनेटिव्हिटी फीचर्स तर मिळतात सोबत Dolby Atmos सपोर्ट असलेले ड्युअल स्टीरियो स्पिकर देण्यात आले आहेत.
मोटोरोलाच्या या फोनमध्ये 16 MP चा सेल्फी कॅमेरा आहे. रियर कॅमेरा सेटअप पाहता, Moto G42 स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. प्रायमरी कॅमेऱ्यासह 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे.
मोटोरोलाचा हा फोन Android 12 OS वर चालतो. मोटोरोलाच्या या फोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्डनं वाढवता येते. Moto G42 मध्ये फेस अनलॉक आणि साईड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.
Moto G42 ची किंमत
Moto G42 स्मार्टफोनचा 4GB रॅम व 128GB व्हेरिएंट ब्राजीलमध्ये 1,529 ब्राजिलयन रील (सुमारे 23,000 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार हा फोन भारतात 15,000 रुपयांच्या आत सादर केला जाऊ शकतो.