8,999 रुपयांमध्ये मोटोरोलाचा जबराट स्मार्टफोन; पहिल्याच सेलमध्ये बंपर ऑफर
By सिद्धेश जाधव | Published: June 6, 2022 09:23 AM2022-06-06T09:23:55+5:302022-06-06T09:25:54+5:30
Moto E32s स्मार्टफोन भारतात 90Hz रिफ्रेश रेट, MediaTek Helio G37 प्रोसेसर, 5,000mAh ची बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंगसह आला आहे.
मोटोरोलाने गेल्या आठवड्यात 90Hz रिफ्रेश रेट, MediaTek Helio G37 प्रोसेसर, 5,000mAh ची बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंगसह Motorola E32s लाँच केला होता. हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे ज्याची विक्री आजपासून सुरु होणार आहे. पहिल्याच सेलमध्ये या हँडसेटच्या खरेदीवर काही ऑफर्सची घोषणा करण्यात आली आहे, ज्यांची माहिती मी पुढे दिली आहे.
Motorola E32s ची किंमत
Moto E32s स्मार्टफोनच्या 3GB रॅम व 32GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 9,299 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB रॅम व 64GB स्टोरेज मॉडेलसाठी 9,999 रुपये मोजावे लागतील. लाँच ऑफर अंतर्गत बेस व्हेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा स्मार्टफोन Flipkart, Reliance Digital, आणि Jio Mart वरून आज दुपारी 12 वाजल्यापासून स्लेट ग्रे आणि मिस्टी सिल्वर कलरमध्ये विकत घेता येईल. HDFC क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट केल्यास 5 टक्के डिस्काउंट देखील मिळेल.
Moto E32s चे स्पेसिफिकेशन्स
यात 6.5-inch HD+ MaxVision डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच, फोन MediaTek Helio G37 प्रोसेसरसह बाजारात आला आहे. ग्राफिक्ससाठी IMG PowerVR GE8320 GPU देण्यात आला आहे. सोबत 4GB पर्यंत RAM आणि 64GB पर्यंतची स्टोरेज आहे. मोटो ई32एस स्मार्टफोन Android 12-बेस्ड MyUX skin वर चालतो. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड-माउंटिड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी Moto E32s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील मुख्य कॅमेरा 16MP चा आहे. तसेच यात 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. या मोटोरोला फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.