बजेटमध्ये आला Vivo चा देखणा स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरची ताकद 

By सिद्धेश जाधव | Published: May 9, 2022 10:28 AM2022-05-09T10:28:30+5:302022-05-09T10:28:40+5:30

Vivo Y15c स्मार्टफोन भारतात MediaTek Helio P35 प्रोसेसर, 13MP कॅमेरा आणि 5,000mAh च्या बॅटरीसह आला आहे.  

5000mah Battery Featured Vivo Y15c Smartphone Launched In India  | बजेटमध्ये आला Vivo चा देखणा स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरची ताकद 

बजेटमध्ये आला Vivo चा देखणा स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरची ताकद 

Next

Vivo नं आपल्या लोकप्रिय ‘वाय’ सिरीजचा विस्तार केला आहे. कंपनीनं बजेट सेगमेंट Vivo Y15c भारतात लाँच केला आहे. हा फोन MediaTek Helio P35 प्रोसेसर, 13MP कॅमेरा आणि 5,000mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे. या फोनचे स्पेक्सतर समोर आले आहेत परंतु Vivo Y15c ची किंमत आणि उपलब्धतेची माहिती मात्र अजूनही समोर आली नाही.  

Vivo Y15c चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y15c मध्ये 6.51-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक पंच होल डिजाईनसह येतो ज्यात सेल्फी कॅमेरा मिळतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा मिळतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. 

Vivo Y15c फोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसरची पावर मिळतो. सोबत 3GB RAM देण्यात आला आहे. कंपनीनं 32GB व 64GB असे दोन स्टोरेज ऑप्शन सादर केले आहेत. तसेच मेमरी वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील मिळतो. हा फोन Android 12 बेस्ड Funtouch OS 12 वर चालतो. 

ड्युअल 4G VoLTE, ब्लूटूथ 5.2, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो यूएसबी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक असे कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील मिळतात. सोबत साईड फिंगरप्रिंट सेन्सर पावर बटनमध्ये एम्बेड करून देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: 5000mah Battery Featured Vivo Y15c Smartphone Launched In India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.