सर्वात स्वस्त! 48MP कॅमेऱ्यासह Motorola Moto E32 स्मार्टफोनची एंट्री; दिवसभर टिकणार बॅटरी 

By सिद्धेश जाधव | Published: May 4, 2022 06:07 PM2022-05-04T18:07:06+5:302022-05-04T18:07:53+5:30

Moto E32 स्मार्टफोन 4GB RAM, Unisoc T606 SoC, 48MP Camera आणि 5,000mAh battery अशा स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहे.

5000mAh Mobile Phone Motorola Moto E32 Launched Know Price Specifications Sale  | सर्वात स्वस्त! 48MP कॅमेऱ्यासह Motorola Moto E32 स्मार्टफोनची एंट्री; दिवसभर टिकणार बॅटरी 

सर्वात स्वस्त! 48MP कॅमेऱ्यासह Motorola Moto E32 स्मार्टफोनची एंट्री; दिवसभर टिकणार बॅटरी 

googlenewsNext

Motorola ने आज आपला स्वस्त स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर केला आहे. कंपनीच्या ‘ई’ सीरीजमध्ये Moto E32 स्मार्टफोननं एंट्री घेतली आहे. हा लो बजेट हँडसेट 4GB RAM, Unisoc T606 SoC, 48MP Camera आणि 5,000mAh battery अशा स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहे.  

कंपनीनं या फोनचा फक्त एकच व्हेरिएंट युरोपियन बाजारात सादर केला आहे. ज्याची किंमत 159 यूरो म्हणजे जवळपास 12,700 रुपये ठेवली आहे. हा मोबाईल Misty Silver आणि Slate Gray कलरमध्ये लाँच झाला आहे. सध्या मोटोरोला भारतीय बाजारात देखील मोठयाप्रमाणावर सक्रिय झाली आहे, त्यामुळे Motorola Moto E32 लवकरच भारतात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

Motorola Moto E32 चे स्पेसिफिकेशन्स  

मोटो ई32 स्मार्टफोनमध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियो, 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. हा आयपीएस एलसीडी पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे, जिच्यावर माय यूएक्सची लेयर मिळते. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T606 चिपसेट देण्यात आला आहे. 

मोटोरोलाने मोटो ई32 स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन आयपी52 वॉटर रेजिस्टन्स रेटिंगसह आला आहे.  

फोटोग्राफीसाठी मोटोरोला मोटो ई32 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.  

Web Title: 5000mAh Mobile Phone Motorola Moto E32 Launched Know Price Specifications Sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.