बजेटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आला Oppo K10; इतकी आहे या दमदार स्मार्टफोनची किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: March 23, 2022 03:02 PM2022-03-23T15:02:29+5:302022-03-23T15:02:41+5:30

Oppo K10 स्मार्टफोन भारतात Snapdragon 680 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह आला आहे.  

50MP primary camera and Snapdragon 680 Soc smartphone Oppo K10 launched in India  | बजेटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आला Oppo K10; इतकी आहे या दमदार स्मार्टफोनची किंमत  

बजेटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आला Oppo K10; इतकी आहे या दमदार स्मार्टफोनची किंमत  

Next

Oppo K10 स्मार्टफोनची भारतातील मिड रेंज सेगमेंटमध्ये एंट्री झाली आहे. कंपनीनं हा फोन Snapdragon 680 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच केला आहे. चला जाणून घेऊया Oppo K10 स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स फीचर्स आणि किंमतीची माहिती.  

Oppo K10 चे स्पेसिफिकेशन्स 

Oppo K10 स्मार्टफोनमध्ये 6.59 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम आधारित कलरओएस 11.1 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 680 प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU देण्यात आला आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.  

Oppo K10 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

Oppo K10 ची किंमत 

Oppo K10 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. या फोनच्या 6GBरॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 14,990 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटसाठी 16,990 रुपये मोजावे लागतील. हा फोन 29 मार्चपासून फ्लिपकार्टवर ब्लॅक कार्बन आणि ब्लू फेम कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल.  

Web Title: 50MP primary camera and Snapdragon 680 Soc smartphone Oppo K10 launched in India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.