अद्याप ५ जी देशभरात पोहोचले नाहीय, पण केंद्राकडून भारत 6G अलायन्सची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 01:50 PM2023-07-07T13:50:01+5:302023-07-07T13:50:10+5:30
भारत 6G अलायन्सचे मुख्य उद्दिष्ट 6G च्या व्यावसायिक आणि सामाजिक गरजा तांत्रिक गरजांच्या पलीकडे समजून घेणे आणि प्रोत्साहन देणे हे आहे.
भारतात अद्याप सर्वत्र ५ जीचे जाळे पसरलेले नाही तोवर केंद्र सरकारने ६जी ची तयारी सुरु केली आहे. अद्याप देशातील मोठा भाग असलेला ग्रामीण भाग अद्याप यापासून दूर आहे. असे असताना भारत 6G जी घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
वैष्णव यांनी नव्या आघाडीची घोषणा केली आहे. दूरसंचार विभागाने (DoT) नवीन वायरलेस तंत्रज्ञानाभोवती नावीन्यपूर्ण काम करण्यासाठी भारत 6G अलायन्सची घोषणा केली आहे. भारत 6G अलायन्स हे सार्वजनिक आणि खाजगी कंपन्या, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि मानक विकास संस्था यांचा समावेश असलेले असेच एक सहयोगी व्यासपीठ आहे. त्याची वेबसाइटही सुरू करण्यात आली आहे.
भारत 6G अलायन्सचे मुख्य उद्दिष्ट 6G च्या व्यावसायिक आणि सामाजिक गरजा तांत्रिक गरजांच्या पलीकडे समजून घेणे आणि प्रोत्साहन देणे हे आहे. इंडिया 6G अलायन्सचे उद्दिष्ट भारतीय स्टार्टअप्स, कंपन्या आणि मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम यांना एकत्र आणून भारतात 6G तंत्रज्ञानाची रचना, विकास आणि उपयोजन यावर काम करणारी कंसोर्टिया तयार करणे आहे.
5G पेक्षा 6G हे १०० पट वेगवान असणार आहे. 6G सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात 1,50,000 ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध होऊ शकतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सरकारला 6G च्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वस्त आणि विश्वासार्ह इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यायची आहे. शिक्षण, ई-कॉमर्ससह अनेक क्षेत्रात विकास होण्याची अपेक्षा आहे. तसेच सिक्स जी हे स्वस्त असण्याची शक्यता आहे.