5G Signal: सेटिंग बदलली तरी 5G सिग्नल येईना? स्मार्टफोन कंपन्यांनी 'गेम' खेळला, काय ते पहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 01:31 PM2022-10-03T13:31:33+5:302022-10-03T13:32:06+5:30
भारतात ८ शहरांत ५जी लाँच झाले आहे. लोक त्यासाठी नेटवर्क शोध शोध शोधत आहेत.
देशात एअरटेलकडून ५जी नेटवर्क रोलआऊट करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशात ५जी स्मार्टफनची विक्री होत आहे. अनेकांनी ५जी नेटवर्क वापरता येईल म्हणून पुढचा विचार करून ५जीचे हे फोन घेतले आहेत. परंतू गेल्या वर्षभरात घेतलेल्या स्मार्टफोनमध्येच ५जी चा सिग्नल दिसत आहे. मग गेल्या वर्षात घेतलेल्या फोनमध्ये का नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दिल्ली, मुंबईतील अनेकांनी सेटिंगही बदलून पाहिली. परंतू, तरीदेखील एअरटेलची त्यांना ५जी ची रेंज येत नाहीय. यात स्मार्टफोन कंपन्यांनी मोठा गेम खेळला आहे. सुरुवातीच्या वर्षात जे स्मार्टफोन विकले गेले त्यात 5G डिसेबल आहे. या वर्षात जे फोन विकले गेले त्यात ५जी इनेबल आहे. म्हणजे सुरुवातीच्या वर्षात जे स्मार्टफोन लाँच झाले, त्यात कंपन्यांनी ५जी रेडी असे दाखवून गेम खेळला होता.
भारतात ८ शहरांत ५जी लाँच झाले आहे. लोक त्यासाठी नेटवर्क शोध शोध शोधत आहेत. ज्यांनी ते मोबाईल घेतलेत त्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांचा फोन डब्बा झालेला नाही. तर कंपन्या ५जी इनेबल करण्यासाठी या मोबाईलवर येत्या काळात अपडेट पाठविणार आहेत. यानंतर हे मोबाईलधारक त्यांच्या मोबाईलमध्ये ५जी वापरू शकणार आहेत. Realme ने यात आघाडी घेतली आहे, ग्राहकांना ओटीए अपडेट मिळण्यास सुरुवात झाली आहे.
एअरटेलचा दावा आहे की 5व्या पिढीच्या सेल्युलर कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये काही सेटिंग्ज देखील बदलाव्या लागतील. यासाठी तुम्हाला नेटवर्क पर्यायावर जावे लागेल. यानंतर तुम्हाला 5G पर्याय निवडावा लागेल. तुमचा स्मार्टफोन 5G नेटवर्कला सपोर्ट करत आहे की नाही हे तपासायचे असेल तर स्मार्टफोनच्या बॉक्सवर दिलेल्या माहितीवरून तुम्ही 5G बँड सपोर्टबद्दल माहिती मिळवू शकता.