OPPO A55 करणार भारतात एंट्री; कमी किंमतीत 5000mAh बॅटरीसह सादर होऊ शकतो हा 5G फोन
By सिद्धेश जाधव | Published: September 15, 2021 03:37 PM2021-09-15T15:37:01+5:302021-09-15T15:37:20+5:30
Budget 5G Phone OPPO A55: OPPO A55 5G हा फोन या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये सादर केला जाईल. OPPO A55 5G मध्ये मीडियाटेकच्या 5G सपोर्टेड प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
OPPO आपल्या 5G फोन्सचा पोर्टफोलियो वाढवण्याची योजना बनवत आहे. यासाठी कंपनी आपल्या ‘ए’ सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन सादर करू शकते. या सीरिजमध्ये OPPO A55 स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो. याआधी हा फोन चीनमध्ये लाँच झाला असून हा फोन तिथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ओपो ए55 च्या भारतीय लाँचची माहिती टिपस्टर मुकुल शर्माने दिली आहे. मुकुलने OPPO A55 ची कोणतीही अचूक लाँच डेट तर सांगितली नाही. परंतु हा फोन या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये सादर केला जाईल असा दावा केला आहे. OPPO A55 स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसह चीनमध्ये लाँच केला गेला होता, त्यामुळे देशात देखील हा फोन याच कॉन्फिगरेशनसह येईल, अशी अपेक्षा आहे.
OPPO A55 5G
OPPO A55 5G मध्ये मीडियाटेकच्या 5G सपोर्टेड प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. हा फोन मीडियाटेक डायमनसिटी 700 चिपसेटवर चालतो. यात 720 × 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. OPPO A55 5G फोनमध्ये अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11 आहे. चीनमध्ये फोन 6 जीबी रॅम आणि 128GB स्टोरेजसह उपलब्ध झाला आहे.
OPPO A55 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13 मेगापिक्सलचा मुख्य रियर सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा पोर्टरेट सेन्सर मिळतो. सेल्फीसाठी फोनमधील 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याची मदत घेता येईल. पावर बॅकअपसाठी OPPO A55 5G मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.